ऋजुता लुकतुके
संपूर्णपणे भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी खास भारतीय खेळाडूंना साथ देतील अशा खेळपट्ट्या बनवल्या जात असल्याचा आरोप पहिल्या साखळी सामन्यापासून होतोय. त्यातच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांचे सहकारी प्रशिक्षक यांनी या संशयात कायम भरच घातली आहे. भारतीय संघ (Ind vs Aus, World Cup Final) सामन्यासाठी त्या त्या गावात पोहोचला की, राहुल आणि त्यांचे तीन सहकारी विमानतळावरून थेट स्टेडिअमवर जातात. तिथं खेळपट्टीची पाहणी करतात आणि मग हॉटेलवर जातात.
अहमदाबादला संघ पोहोचला तेव्हा बरीचशी रात्र झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी संघातील खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी एकत्रच खेळपट्टीची पाहणी केली. आणि सामन्याच्या दोन दिवस आधी समोर दिसत होती ती काळ्या मातीने बनलेली २२ यार्डांची खेळपट्टी.
इथं चेंडू हळू बॅटवर येईल. आणि काही वेळा खाली राहील (म्हणजे उसळी घेणार नाही) अशी शक्यता राहुल आणि रोहित यांना प्रथमदर्शनी वाटतेय. त्यामुळेच रोहीतने पहिल्या दिवशी स्लिपमध्ये खाली राहणारे झेल पकडण्याचा सराव स्वत; केला आणि इतरांनाही करायला लावला.
(हेही वाचा-World Cup 2023 Final : वर्ल्ड कपच्या मेगा फायनलवर पावसाचं सावट?)
याचाच अर्थ अहमदाबादची खेळपट्टी पुन्हा एकदा फिरकीला साथ देईल असं भारतीय संघ प्रशासनाला वाटतंय. सामन्या आधीच्या पत्रकार परिषदेत मात्र रोहीत सावध होता. ‘पाकिस्तान विरुद्ध इथं खेळलो तेव्हा खेळपट्टी कोरडी होती. आता थोडं गवत इथं दिसत आहे. शिवाय हवामानही थंड असेल. त्यामुळे खेळपट्टीचा नेमका अंदाज आताच बांधणं कठीण असेल,’ असं रोहितने बोलून दाखवलं.
पण, अंतिम सामन्यात नाणेफेक फारशी महत्त्वाची नसेल असंही त्याने म्हटलं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाने या मैदानावर इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे या मैदानाच्या त्यांच्या आठवणीही सुखद आहेत. मायकेल स्टार्क आणि हेझलवूड संघासाठी भेदक गोलंदाजी करत आहेत.
भारतीय अंतिम संघ सामन्याच्या दिवशी सकाळी ठरणार आहे. पण, खेळपट्टीचं स्वरुप पाहता राहूल आणि रोहीत तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा विचार करत असल्याचंही समजतंय. दुसरं म्हणजे खेळपट्टीवर रोलर फिरवला जात आहे. याचा अर्थ चेंडूचा वेग मंदावणार. आणि अशावेळी पहिली फलंदाजी करताना ३१५ धावा पुरेशा ठरू शकतात. कारण, दुसरी फलंदाजी करणं अवघड होऊ शकतं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community