Ind vs Ban, 1st ODI : भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना धरमशाला ऐवजी आता ग्वाल्हेरला

Ind vs Ban, 1st ODI : ६ ऑक्टोबरला ही एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे 

167
Ind vs Ban, 1st ODI : भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना धरमशाला ऐवजी आता ग्वाल्हेरला
Ind vs Ban, 1st ODI : भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना धरमशाला ऐवजी आता ग्वाल्हेरला
  • ऋजुता लुकतुके

येत्या ऑक्टोबर महिन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ भारतात एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना आता धरमशालाऐवजी ग्वाल्हेरला हलवण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. धरमशाला मैदानात नुतनीकरणाचं काम सुरू होणार असल्यामुळे हा बदल केल्याचं बीसीसीआयने कळवलं आहे. ‘भारत आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना, जो आधी धरमशाला इथं ६ ऑक्टोबर २०२४ ला होणार होता, तो आता ग्वाल्हेरला होईल. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंच्या ड्रेसिंग रुमचं नुतनीकरण करण्याचं ठरवलं आहे. हे काम वेळेत पूर्ण होणार नसल्याने हा बदल करण्यात आला आहे,’ असं बीसीसीआयने (BCCI) काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (Ind vs Ban, 1st ODI)

(हेही वाचा- Pramod Bhagat Suspended : पॅरा ॲथलीट प्रमोद भगतचं १८ महिन्यांसाठी निलंबन)

ग्वाल्हेर शहरात नव्याने उभारलेल्या माधवराव सिंदिया क्रिकेट मैदानावरील हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असेल. शिवाय २०१० मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यानंतरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं एकमेव द्विशतक ठोकलं होतं. (Ind vs Ban, 1st ODI)

याशिवाय इंग्लंडच्या भारत दौऱ्यात होणाऱ्या टी-२० मालिकेच्या वेळापत्रकातही थोडा बदल करण्यात आला आहे. आता पहिला टी-२० सामना हा चेन्नईऐवजी कोलकाताला होईल. तर कोलकाताला होणारा टी-२० सामना हा चेन्नईला होईल. २२ जानेवारी २०२५ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी हे सामने होणार आहेत. कोलकात्यातील सामन्याचा दिवस बदलण्याची विनंती कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला केली होती. त्यानुसार बीसीसीआयने हे बदल केले आहेत. उर्वरित तीन टी-२० सामने हे ठरल्याप्रमाणे होणार आहेत. (Ind vs Ban, 1st ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.