Ind vs Ban : विराट कोहलीच्या शतकासाठी खरंच पंचांनी वाईड दिला नाही? ही पंचांची चूक होती का?

विराट कोहलीला शतकासाठी ३ धावा हव्या असताना पंचांनी नसुमचा एक चेंडू वाईड दिला नाही. त्यामुळेच विराटचं शतक शक्य झाला असा आरोप काही जण करतायत. हे कितपत खरं आहे? पंचांची ती नजरचूक होती की, त्यांनी विराटला खरंच मदत केली? 

97
Ind vs Ban : विराट कोहलीच्या शतकासाठी खरंच पंचांनी वाईड दिला नाही? ही पंचांची चूक होती का?
Ind vs Ban : विराट कोहलीच्या शतकासाठी खरंच पंचांनी वाईड दिला नाही? ही पंचांची चूक होती का?

ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश विरुद्ध (Ind vs Ban) नाबाद १०३ धावा करून संघाला दमदार विजय मिळवून दिला. खुद्द विराटचं एकदिवसीय क्रिकेटमधील हे ४८वं शतक होतं. ४२ व्या षटकांत नसुम अहमदच्या चेंडूवर जोरदार षटकार लगावत विराटने आपलं शतक आणि भारताचा विजय पूर्ण केला.

पण, याच षटकातील पहिला चेंडू काहीसा वादग्रस्तही ठरला होता. आणि त्याची सगळीकडे चर्चाही होतेय. झालं असं की नसुमचा हा चेंडू विराटच्या डावीकडे वळला. विराटही तो खेळण्यासाठी यष्टी सोडून थोडा डावीकडे सरकला. हा चेंडू वाईड असू शकला असता. पण, पंचांनी तो वाईड दिला नाही. पंचांनी विराटचं शतक होऊ नये यासाठी तो वाईड दिला नाही का, अशी आता चर्चा होतेय.

कारण, भारतीय संघाला तेव्हा विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. आणि विराटला शतक पूर्ण करण्यासाठी तीन. अशावेळी तो चेंडू वाईड दिला असता तर विराटचं शतकाचं गणित कदाचित बिघडलं असतं. पण, विराटला मदत करण्यासाठी खरंच पंचांनी तो चेंडू वाईड दिला नाही का?

(हेही वाचा-Thane Cluster : ठाण्यात क्लस्टर योजनेतून १६००० घरे होणार उपलब्ध, ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)

विराटही काही सेकंद आश्चर्याने पंचांकडे बघत होता. ते वाईड देतात का याची उत्सुकता त्याला होती. पण, त्यांनी वाईड दिला नाही. नसुम अहमदही यावर थोडा हसला. पुढचा चेंडू विराटने खेळून काढला. आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर मिड-ऑफला षटकार लगावत त्याने शतक आणि त्याबरोबरच भारतीय विजय साकार केला.

अख्खं स्टेडिअम आणि ड्रेसिंग रुम विजयाच्या जल्लोषात बुडली. वाईडचा नियम नेमकं काय सांगतो.

कसोटी क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वाईडचे नियम काटेकोर आहेत. इथं एक धावही निकालात फरक करू शकते. क्रिकेटच्या नियमावलीत वाईड बॉलचा नियम हा २२ व्या कलमाअंतर्गत येतो. चेंडू नोबॉल नसेल तर फलंदाज त्याक्षणी उभा असेल त्यापेक्षा चेंडू निर्धारित अंतराच्या बाहेर असेल आणि फलंदाज मूळ ज्या जागी उभा होता, त्यापासूनही तो बाहेर असेल तर चेंडू वाईड दिला जावा.(Ind vs Ban)

नियमित क्रिकेट फटका मारण्याच्या अवाक्या बाहेर असलेला चेंडू वाईड दिला जावा, असं वाईड चेंडूची व्याख्या सांगते. फक्त फलंदाज तेव्हा नेमका कुठे उभा होता, हे बघून पंचांनी यावर निर्णय घ्यायचा आहे. थोडक्यात चेंडू टाकताना विराटही थोडा क्रीझच्या बाजूला आल्यामुळे पंचांनी कालचा चेंडू वाईड दिला नसावा. कारण, ते ठरवण्याचा अधिकार पंचांना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईडच्या बाबतीत पंचांचा निर्णय अंतिम असतो. त्या विरोधात अपील करता येत नाही.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.