-
ऋजुता लुकतुके
बांगलादेश विरुद्ध जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतला आहे. तर मोहम्मद सिराजही त्याच्या साथीने संघात असणार आहे. आणि या दोघांच्या बरोबरीने संघात आहेत आकाश दीप (Akash Deep) आणि यश दयाल (Yash Dayal). पैकी आकाश दीपने (Akash Deep) इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत शेवटची कसोटी खेळली आहे. पण, यश दयाल (Yash Dayal) हे नवीन नाव आहे. आयपीएल गाजवल्यानंतर त्याची संघात वर्णी लागली आहे. यश दयाल दोन गोष्टींसाठी चाहत्यांना लक्षात असेल. एक जेव्हा रिंकू सिंगने त्याला एका षटकात ५ षटकार ठोकले होते. आणि दुसरी आठवण गेल्या हंगामातील जेव्हा बंगळुरू फ्रँचाईजीकडून त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती.
भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे. हा संघ पाकिस्तानला त्यांच्या मैदानात लोळवून भारतात येणार आङे. त्यामुळे या मालिकेची रंगत वाढली आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयनं १६ सदस्यांच्या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. याचवेळी भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्व असणारा दुलिप करंडक सुरु आहे. यामध्ये भारताचे क्रिकेटपटू खेळत आहेत. दुलिप करंडकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला (Akash Deep) भारतीय संघात स्थान मिळालं आहे. त्यानं एका सामन्यात ९ बळी घेतले असून त्यामुळे त्याला भारतीय संघाची दारं पुन्हा उघडली आहेत.
(हेही वाचा – Surat च्या गणेशोत्सव मंडपावर मुसलमानांकडून दगडफेक; 33 जणांना अटक)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी (Ind vs Ban Test Series) १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयनं रविवारी रात्री पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी पुनरागमन केलं आह दुलिप करंडक गाजवणाऱ्या आकाश दीपला देखील निवड समितीनं संधी दिली आहे. भारत अ संघाकडून खेळताना आकाश दीपनं या सामन्यात ९ बळी मिळवत खळबळ उडवून दिली होती.
भारतासाठी आकाश दीपनं (Akash Deep) आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. दुलिप करंडक स्पर्धेतील सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना त्यानं पहिल्या डावात भारत ब संघाच्या ४ बळी घेतले. तर, दुसऱ्या डावात ५ बळी मिळवले. आकाश दीपने (Akash Deep) सामन्यात ९ बळी टिपले. मात्र तो भारत अ संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. भारत ब विरुद्ध आकाश दीपचा संघ पराभूत झाला असला तरी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. आता अंतिम अकरामध्ये या दोघांची निवड होते का हे पहावं लागेल. (Ind vs Ban Test Series)
(हेही वाचा – Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंग अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक)
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, बांगलादेशनं पाकिस्तानला पराभूत करत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय संघाला पहिलं स्थान कायम ठेवायचं असल्यास बांगलादेशला पराभूत करणं आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community