-
ऋजुता लुकतुके
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड रविवारी जाहीर झाली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने १६ जणांचा निवडला आहे. तेज गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसंच श्रेयस अय्यरला संघातून डच्चू मिळालाय. बाकी संघ हा अपेक्षेप्रमाणेच आहे. शिवाय जसप्रीत बुमराह, विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंतने संघात पुनरागमन केले आहे. आधी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येईल अशी अटकळ होती. पण, आता बुमराह खेळणार आहे. (Ind vs Ban, Test Series)
भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी चेन्नई इथं खेळणार आहे. तर २७ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेशमध्ये (Ind vs Ban) तीन सामन्यांची टी२० मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.
(हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी Bombay High Court कडून सात सदस्यीय समिती स्थापन)
🚨 NEWS 🚨- Team India’s squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced.
Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Virat Kohli, KL Rahul, Sarfaraz Khan, Rishabh Pant (WK), Dhruv Jurel (WK), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep… pic.twitter.com/pQn7Ll7k3X
— BCCI (@BCCI) September 8, 2024
(हेही वाचा – C C Road: शहर भागांतील १३५ किलोमीटर रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट कामांना अखेर मंजूरी)
विशेष म्हणजे बीसीसीआयने रिषभ पंत, के एल राहुल (KL Rahul) आणि ध्रुव जुरेल अशा तीन यष्टीरक्षक फलंदाजांची निवड केली आहे. पण, यातील रिषभ पंत खेळण्याची शक्यचा सर्वाधिक आहे. तर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलेल्या १६ खेळाडूंमध्ये चार फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. तीन यष्टिरक्षकांसह एकूण आठ फलंदाज आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल पहिल्यांदाच भारतीय संघात सामील झाला आहे. तो आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीकडून खेळला होता.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल. (Ind vs Ban, Test Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community