- ऋजुता लुकतुके
१९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या कसोटीसाठीचा भारतीय संघ रविवारी बीसीसीआयने जाहीर केला आहे. रोहित, विराट, बुमरा हे खेळाडू मोठ्या विश्रांतीनंतर भारतीय संघात परतले आहेत. तर काही खेळाडूंना संघात स्थान मिळालेलं नाही. अशी ठळक दोन नावं आहेत ती, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी आणि या दोघांना संघातून वगळलं की आणखी काही कारण आहे, अशी चर्चा आता रंगली आहे. (Ind vs Ban Test Series)
🚨 NEWS 🚨- Team India’s squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced.
Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Virat Kohli, KL Rahul, Sarfaraz Khan, Rishabh Pant (WK), Dhruv Jurel (WK), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep… pic.twitter.com/pQn7Ll7k3X
— BCCI (@BCCI) September 8, 2024
श्रेयस अय्यर सध्या दुलीप करंडक स्पर्धेत खेळत आहे, याशिवाय मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत शमी या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, अशी आशा चाहत्यांना होती. पण हे होऊ शकले नाही.
(हेही वाचा – PPF Scheme : पीपीएफ योजनेत होणार ‘हे’ ३ बदल)
या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला पाठीला दुखापत झाली होती. यानंतर त्याला संघाबाहेर व्हावे लागले. यानंतर अय्यर रणजी ट्रॉफीमध्ये खेळला नाही, त्यामुळे बीसीसीआयनेही श्रेयसला केंद्रीय करारातून वगळले होते. अय्यरने आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सना लीग जिंकून दिली. पण, खुद्ध श्रेयसचा फॉर्म यथातथाच होता.
यानंतर अय्यरचा श्रीलंकेसोबत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला, या मालिकेत श्रेयसची बॅट शांत राहिली. आता दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून अय्यरला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी होती, मात्र पहिल्याच सामन्यात अय्यरला फारशी कामगिरी करता आली नाही, त्यानंतर आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. (Ind vs Ban Test Series)
(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘या’ खेळाडूंनी गाजवली दुलिप करंडकाची पहिली फेरी)
मोहम्मद शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून खेळताना दिसला होता. यादरम्यान तो जखमी झाला आणि तेव्हापासून शामी संघातून बाहेर आहे. मात्र, आता शमी पूर्णपणे तंदुरुस्त असून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांत आहे. अलीकडेच निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शामीच्या पुनरागमनाविषयी भाष्य केलं होतं. आधी तो रणजी करंडक खेळेल आणि मग भारतीय संघात तो पुन्हा खेळू शकेल, असं आगरकर म्हणाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community