पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठा बदल; ‘या’ अनुभवी खेळाडूंना विश्रांती

138

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौ-यावर आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र भारताने मालिकेतील सलामीचे दोन सामने गमावल्याने, बांगलादेश संघाने 2-1 ने मालिका जिंकली. आता या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ के. एल. राहूलच्या नेतृत्त्वात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 18 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिकेसाठी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात नसणार आहेत. त्याजागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

( हेही वाचा: ३ वर्षांनी शतक केल्यावर काय म्हणाला विराट कोहली? व्हिडिओ होतोय व्हायरल… )

रोहित शर्मा संघाबाहेर

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वन डे मालिकेच्या दुस-या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली. तरीदेखील रोहित शर्माने 9 व्या क्रमांकावर येत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. परंतु, रोहितची झुंज अयशस्वी ठरली आणि भारतीय संघाचा पराभव झाला.

कसोटी सामन्यातील भारतीय संघ

लोकेश राहूल ( कर्णधार) शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रंन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकून, जयेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.