Ind vs Eng, 1st ODI : इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी आणि ६८ चेंडू राखून विजय

Ind vs Eng, 1st ODI : भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

42
Ind vs Eng, 1st ODI : इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी आणि ६८ चेंडू राखून विजय
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वी म्हटल्याप्रमाणे झाला. आक्रमक सुरूवात करून इंग्लिश फलंदाजांना कोंडीत पकडू आणि मग फलंदाजीतही तो बाणा कायम ठेवू असं रोहित म्हणाला होता आणि मैदानात तेच घडलं. त्यामुळे नाणेफेक जिंकून इंग्लिश कर्णधार जोस बटलरने पहिली फलंदाजी घेतली तेव्हा रोहितला फारसा प्रश्न पडला नाही. फिल सॉल्ट (४३) आणि बेन डकेट (३२) यांनी ७५ धावांची सलामी दिली खरी. पण, एकदा सॉल्ट धावचित झाल्यानंतर इंग्लंडचे पुढचे फलंदाज एकामागून एक बाद झाले. जो रुट, हॅरी ब्रूक बाद झाल्यावर इंग्लंडची अवस्था ४ बाद १११ अशी झाली. (Ind vs Eng, 1st ODI)

अखेर जोस बटलर (५१) आणि बेथेल (५१) यांनी मधल्या फळीत ५९ धावांची भागिदारी करत डाव सावरला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने जलदगती २१ धावा करत इंग्लंडला २५० धावांच्या जवळ नेलं. भारतातर्फे हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. (Ind vs Eng, 1st ODI)

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators: नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आठ बांगलादेशींना अटक)

भारताचा डाव सुरू झाला तेव्हा मात्र यशस्वी आणि रोहित लागोपाठच्या षटकांत बाद झाल्यामुळे भारताची अवस्था २ बाद १९ अशी झाली होती. पण, तिथून पुढे शुभमन गिल ८७ आणि श्रेयस अय्यर ५९ आणि अक्षर पटेल ५२ यांनी तीन मोठ्या भागिदारी करत भारतीय विजय साध्य केला. ४ बाद २२१ वरून अक्षर, शुभमन आणि राहुल हे फलंदाज एका मागून एक बाद झाल्यामुळे काही काळ सामन्यात रंगत निर्माण झाली होती. पण, हार्दिक आणि जाडेजाने डोकं शांत ठेवून उर्वरित २० धावा पूर्ण केल्या आणि भारताचा विजय साध्य झाला. (Ind vs Eng, 1st ODI)

९६ चेंडूंत ८७ धावा करणारा शुभमन गिल सामनावीर ठरला. भारतीय संघाने आरामात हा सामना जिंकला आणि आता मालिकेतही १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा एकदिवसीय सामना ९ फेब्रुवारीला कटक इथं होणार आहे. गुडघा दुखावल्यामुळे विराट पहिला एकदिवसीय सामना खेळला नाही. पण, तो वेळेत तंदुरुस्त होईल असं समजतंय. (Ind vs Eng, 1st ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.