Ind vs Eng, 1st ODI : रवींद्र जडेजाचे ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण, ही कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज

37
Ind vs Eng, 1st ODI : रवींद्र जडेजाचे ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण, ही कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज
Ind vs Eng, 1st ODI : रवींद्र जडेजाचे ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण, ही कामगिरी करणारा पाचवा भारतीय गोलंदाज
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघातील ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने गुरुवारी नागपूरमध्ये कारकीर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा सर केला. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९ षटकांत २६ धावा देत ३ बळी मिळवले. आणि त्याचबरोबर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात मिळून त्याने ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण केले. नागपूरमध्ये त्याची गोलंदाजी इंग्लंडला २५० धावांच्या आत गुंडाळताना निर्णायक ठरली. जो रुट, जेकब बेथेल आणि आदील रशिद हे जम बसलेले फलंदाज त्याने बाद केले. आणि आदीलचा बळी त्याचा ६०० वा आंतरराष्ट्रीय बळी ठरला. अशी कामगिरी करणारा तो फक्त पाचवा भारतीय गोलंदाज आहे. (Ind vs Eng, 1st ODI)

अनिल कुंबळे (९५३), रविचंद्रन अश्विन (७६५), हरभजन सिंग (७०७) आणि कपिल देव (६८७) यांच्यानंतर जडेजाने ही कामगिरी केली आहे. २००९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर आपल्या अष्टपैलू कामगिरीने जडेजाने भारतासाठी तीनही प्रकारात मोलाची भूमिका बजावली आहे. कसोटींत त्याने ३२३ बळी आणि ३,३७० धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९८ सामन्यांत त्याने २२३ बळी मिळवले आहेत. या प्रकारात कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि अजित आगरकर नंतर २०० बळी घेणारा तो सातवा भारतीय गोलंदाज आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने २,७५६ धावा केल्या आहेत. (Ind vs Eng, 1st ODI)

(हेही वाचा- Encroachment on Forts : अहिल्यानगरमधील ११ गड-किल्ले ३१ मेपर्यंत अतिक्रमणमुक्त करणार)

७४ टी-२० सामन्यांत त्याने ५४ बळी मिळवले आहेत. तर ५१५ धावा केल्या आहेत. भारताने जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जाडेजाने टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सध्या तो अव्वल आहे. (Ind vs Eng, 1st ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.