![Ind vs Eng, 1st ODI : २ धावांवर बाद झाल्यावर हताश झालेला रोहित आणि इंटरनेटवर निवृत्तीच्या मागणीला जोर Ind vs Eng, 1st ODI : २ धावांवर बाद झाल्यावर हताश झालेला रोहित आणि इंटरनेटवर निवृत्तीच्या मागणीला जोर](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-07T100218.301-696x377.webp)
-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरल्यानंतर या इंग्लंडविरुद्धची ही मालिका रोहितसाठी खरी कसोटी आहे. पण, नागपूरमध्ये पुन्हा एकदा खराब फटका त्याच्या विनाशाचं कारण ठरला. इतकंच नाही तर ज्या पद्धतीने रोहित बाद झाला त्यामुळे चर्चा आणखी होणार आहे. आधीच्याच षटकात यशस्वी जयसवाल बाद झालेला असताना रोहितने मोठा फटका खेळण्याची जोखीम पत्करली. आणि साकीब महमूदच्या इनस्विंगरवर रोहित पूर्णपणे चकला. त्याने चेंडू मिडविकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. पण, बॅटच्या टोकाला लागून तो हवेत उडला. आणि लिव्हिंगस्टोनने काम फत्ते केलं. (Ind vs Eng, 1st ODI)
(हेही वाचा- ऐतिहासिक वाघनखे नागपुरात! Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचं उद्घाटन)
रोहितला खराब फटक्याचा अंदाज आलेला होता. कारण, अगदी हताश होऊन तो तंबूत परतला. भारताची अवस्थाही १ बाद १९ अशी झाली. त्यानंतर श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत भारताला विजय मिळवून दिला. (Ind vs Eng, 1st ODI)
Rohit Sharma Wicket Vs Eng #imdvseng #odi pic.twitter.com/eLFkYMzfTK
— yogendracrick (@cricketlover672) February 6, 2025
रोहित शर्माच्या बाद होण्यावर सोशल मीडियातही प्रतिक्रिया उमटत राहिल्या. रोहितचा प्रभाव कमी होत असल्याचं ट्विटरवर लोकांनी म्हटलं आहे. काही अशाच प्रतिक्रिया पाहूया, (Ind vs Eng, 1st ODI)
Rohit Sharma is not Effective in powerplays, outside powerplays, in Tests, in ODIs, in India, Outside India 💔 pic.twitter.com/hPwrs1HsHs
— Dinda Academy (@academy_dinda) February 6, 2025
Like this Post if you think Rohit Sharma should retire asap. pic.twitter.com/OnqKaeALjv
— Krishna. (@KrishVK_18) February 6, 2025
Rohit Sharma pic.twitter.com/1tymJoiQds
— Rishh (@Riocasm) February 6, 2025
Show me more useless player than rohit sharma i will delete my account for forever pic.twitter.com/Mcl0bHI9tx
— Kevin (@imkevin149) February 6, 2025
ऑस्ट्रेलियापासून खराब फॉर्म रोहीतची पाठ सोडत नाहीए. बोर्डर – गावसकर चषक मालिकेत रोहितने ५ डावांमध्ये ६ धावांच्या सरासरीने ३१ धावा केल्या आहेत. आता या मालिकेची सुरुवातही त्याच्यासाठी खराब झाली आहे. यशस्वी आणि रोहितच्या खराब सुरुवातीनंतर मात्र शुभमन गिल (८७), श्रेयस अय्यर (५९) आणि अक्षर पटेल (५३) यांनी जबाबदारीने खेळत भारताला मोठ्या फरकाने सामना जिंकून दिला. विराट कोहली गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकला नाही. (Ind vs Eng, 1st ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community