भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी २० मालिकेत ४-१ ने मालिका विजय संपादन केल्यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात एकदिवसीय सामन्यांच्या (Ind vs Eng 1st ODI) मालिकेत इंग्लंड संघाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. (Ind vs Eng 1st ODI)
हेही वाचा-लोकप्रिय क्रिकेट समीक्षक Dwarkanath Sanzgiri यांचे दीर्घ आजाराने निधन
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतग्रस्त असून इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळणार नसल्याचं रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. तसेच विराट ऐवजी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, अशीही माहिती रोहितने दिली आहे. (Ind vs Eng 1st ODI)
हेही वाचा-Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय पंच नितीन मेमन यांचाही पाकला जायला नकार
सलामीवीर म्हणून भरपूर धावा करणारा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवल्यानंतर टी-२० संघात प्रवेश मिळालेला हर्षित राणा (Harshit Rana) यांनी एकदिवसीय पदार्पण केले आहे. (Ind vs Eng 1st ODI)
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीबद्दल सांगितले, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. सुरुवातीला चेंडूवर आक्रमक राहावे लागेल आणि नंतर चांगली कामगिरी करावी लागेल. थोडा वेळ विश्रांती घेणे चांगले आहे, ही एक नवीन सुरुवात आहे आणि चांगली कामगिरी करण्याची एक उत्तम संधी आहे. खेळण्यासाठी थोडा वेळ काढणे खूप महत्वाचे आहे. यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा पदार्पण करत आहेत. दुर्दैवाने विराट खेळत नाहीये. काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला.” (Ind vs Eng 1st ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community