-
ऋजुता लुकतुके
रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा ही फिरकीपटूंची जोडी भारताची कसोटी क्रिकेटमधील सगळ्यात यशस्वी जोडी ठरली आहे. दोघांनी आतापर्यंत ५० कसोटींत मिळून ५०४ बळी मिळवले आहेत. आणि असं करताना अनिल कुंबळे आणि हरभजनसिंग जोडीचा ५४ कसोटींत ५०१ बळींचा विक्रम त्यांनी मागे टाकला आहे. (Ind vs Eng 1st Test)
इंग्लंड विरुद्ध हैद्राबाद कसोटीत दोघांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. आणि त्याचवेळी कुंबळे – हरभजन जोडीचा विक्रम मोडला. भारतासाठी हरभजन आणि झहीर खान ही जोडी या यादीत तिसरी आहे. त्यांनी ५९ कसोटींत ४७४ बळी मिळवले आहेत. (Ind vs Eng 1st Test)
History by Ashwin – Jadeja.
The duo completed 500 wickets as a pair in Test cricket.
The Greatest spin duo ever. pic.twitter.com/yHsEkWxvMU
— Johns. (@CricCrazyJohns) July 23, 2023
(हेही वाचा – Republic Day : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ध्वजवंदन)
हैद्राबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी इंग्लंडने पहिली फलंदाजी घेतल्यानंतर बॅझ-बॉल क्रिकेटला साजेशी आक्रमक सुरुवात केली होती. पण, कर्णधार रोहितने चेंडू अश्विनच्या हातात दिला आणि तिथून इंग्लंडचे फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकत गेले. अश्विननेच जॅक क्रॉली आणि बेन डकेट या जम बसलेल्या सलामीवीरांना बाद केलं. त्यानंतर तळाच्या मार्क वूडचा अडसरही त्यानेच दूर केला. (Ind vs Eng 1st Test)
तर जाडेजाने ऑली पोप आणि जो रुट यांना बाद करत मधल्या फळीला खिंडार पाडलं. अश्विनने ६८ धावांत ३ तर जाडेजाने ८८ धावांत ३ बळी मिळवले. त्यामुळेच भारतीय संघ इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत गुंडाळू शकला. (Ind vs Eng 1st Test)
गोलंदाजांच्या यशस्वी जोडीबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी १३८ कसोटींत १०३९ बळी घेतले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्रा ही जोडी आहे. त्यांनी १०४ कसोटींत एकत्रपणे १००१ बळी घेतले आहेत. (Ind vs Eng 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community