Yashasvi Jaiswal : …आणि यशस्वी जयसवालवर राहुल द्रविडने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला!

यशस्वी जयसवाल फक्त टी-२० नाही तर एकदिवसीय आणि कसोटीतही प्रभावी ठरेल असं द्रविडना का वाटलं?

213
Yashasvi Jaiswal : ‘या’ विक्रमासह यशस्वी जयस्वाल सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या पंक्तीत
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड हैद्राबाद कसोटीत पहिल्या डावात भारतीय सलामीवीर यशस्वी जयसवालची (Yashasvi Jaiswal) ८० धावांची खेळी ही लक्षवेधक ठरली. एकतर इंग्लंडच्या २४६ धावांना उत्तर देताना यशस्वीने गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवल्यामुळे भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. आणि पहिल्याच दिवशी कसोटीवर वर्चस्व मिळवणं भारताला शक्य झालं. (Yashasvi Jaiswal)

आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यशस्वी जयसवालने टी-२०, एकदिवसीय आणि आता कसोटीतही सलामीवीर म्हणून संघातील आपली दावेदारी मजबूत केली. ७४ चेंडूंत ८० धावांची खेळी करून तो जो रुटच्या गोलंदाजीवर अलगद बाद झाला. (Yashasvi Jaiswal)

(हेही वाचा – Canada-India Relations: पन्नू प्रकरणानंतर आता भारतासोबत संबंध सुधारत आहेत, कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे मत)

सकारात्मक फटके खेळायचा निर्धार – यशस्वी जयसवाल

पण, त्याच्या खेळीतील षटकार आणि चौकारांचा आवाज भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दिवसभर घुमत राहिला. कारण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एकदिवसीय विश्वचषकानंतरच्या आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये वारंवार मीडियाशी बोलताना यशस्वी जयसवालचं (Yashasvi Jaiswal) नाव घेत होते. आणि तो तीनही प्रकारात खेळू शकेल असा खेळाडू असल्याचं ठासून सांगत होते. ते म्हणणं आपल्या सकारात्मक फलंदाजीने यशस्वीने खरं करून दाखवलंय. (Yashasvi Jaiswal)

हैद्राबादमधील डावानंतर स्वत: यशस्वीही खुश होता. ‘आक्रमक खेळायचं असं काही ठरवलं नव्हतं. पण, काही चेंडूंवर धावा वसूल करायच्याच असं नक्की ठरवलं होतं. आक्रमक म्हणण्यापेक्षा सकारात्मक फटके खेळायचे हा निर्धार होता,’ असं यशस्वी (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर मीडियाशी बोलताना म्हणाला. (Yashasvi Jaiswal)

(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : जेव्हा राम मंदिरात उद्योगपती श्रीधर वेंबू यांच्या आईचं पाकीट हरवतं…)

कसोटी संघातही दावेदारी

यशस्वीने यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यातही ३८७ चेंडूंत १७१ धावांची खेळी साकारली होती. परदेशातील खेळपट्टीवर केलेली ती आव्हानात्मक खेळी आणि इंग्लंड विरुद्धची तडाखेबंद ८० धावांची खेळी यामुळे यशस्वीने (Yashasvi Jaiswal) कसोटी संघातही आपली दावेदारी आता मजबूत केली आहे. (Yashasvi Jaiswal)

यशस्वीचं (Yashasvi Jaiswal) पदलालित्य आणि फटक्यांची अचूक निवड याविषयी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. यशस्वी (Yashasvi Jaiswal) आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. आणि या संघाशी राहुल द्रविडही अनेक वर्ष जोडलेले आहेत. त्यामुळे यशस्वीला त्यांनी लहानपणापासून पाहिलं आहे. शिवाय विंडिजविरुद्धच्या १७१ धावांच्या खेळीमुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तो तयार झाल्याचं द्रविड यांचं मत आहे. यशस्वीनेही आतापर्यंत हा विश्वास सार्थ करून दाखवला आहे. (Yashasvi Jaiswal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.