- ऋजुता लुकतुके
मध्य प्रदेशचा सातत्यपूर्ण फलंदाज रजत पाटिदारला भारतीय संघाची लॉटरी लागली आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी विराट कोहली ऐवजी रजत पाटिदारची निवड बीसीसीआयने जाहीर केली आहे. अगदी अलीकडे इंग्लिश लायन्स संघाविरुद्ध त्याने १११ आणि १५१ धावांची खेळी केली होती. (Ind vs Eng 1st Test)
त्या जोरावरच त्याने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं आहे. अर्थात, पहिली कसोटी सुरू असल्यामुळे रजतला आता दुसऱ्या कसोटीसाठीच भारतीय संघात दाखल होता येईल. विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटींतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. आणि त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे गुरुवारी बीसीसीआयने ३० वर्षीय रजत पाटिदारची निवड केली आहे. (Ind vs Eng 1st Test)
🚨 Rajat Patidar has been called up to India’s Test squad as a replacement for Virat Kohli
More details 👉 https://t.co/nAz53IAPtg #INDvENG pic.twitter.com/wfWJkKKgat
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 24, 2024
(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशकडून खेळणारा रजत पाटिदार अलीकडे भन्नाट फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत ५० कसोटींमध्ये त्याने ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. आणि त्याची सरासरी ४६ धावांची आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रजतने एकदिवसीय संघात पदार्पण केलं आहे. पण, कसोटी संघात वर्णी लागण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. मागची किमान २ वर्षं तो कसोटी संघाचे दरवाजेही आपल्या कामगिरीने ठोठावतो आहे. (Ind vs Eng 1st Test)
पण, इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांना घेऊन खेळतो आहे. त्यामुळे रजत पाटिदारचा अंतिम अकरामध्ये समावेश थोडा कठीण आहे. (Ind vs Eng 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community