Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटला खुणावतोय ‘हा’ विक्रम

अलीकडेच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे. आता त्याला कसोटीतील काही विक्रम खुणावत आहेत. 

230
Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटला खुणावतोय ‘हा’ विक्रम
Ind vs Eng 1st Test : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटला खुणावतोय ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात आपला फॉर्म दाखवून दिला आहे. आणि त्याचबरोबर फलंदाजीतील काही विक्रमही त्याने सर केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) मागे टाकत ५१ वं शतक झळकावलं. आता विराट इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी तयार होत आहे. (Ind vs Eng 1st Test)

आणि इथंही काही विक्रम त्याला खुणावतायत. सगळ्यात पहिला मैलाचा दगड विराटसमोर असेल तो कसोटीतील ९,००० धावांचा. ३५ वर्षीय विराट (Virat Kohli) सर्वाधिक कसोटी धावा करणारा चौथा भारतीय आहे. सध्या त्याच्या नावावर ११३ कसोटींत ८,८४८ धावा जमा आहेत. म्हणजे ९,०००च्या टप्प्यासाठी त्याला हव्या आहेत अजून फक्त १५२ धावा. (Ind vs Eng 1st Test)

(हेही वाचा – Eknath Shinde उद्यान मंदिर, शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिर शोभयात्रेत सहभाग)

राहुल द्रविड दुसऱ्या, तर सुनील गावसकर तिसऱ्या क्रमांकावर

त्याच्या नावावर ३० कसोटी शतकं आणि २९ अर्धशतकं आहेत. त्याने ९,००० धावा पूर्ण केल्यावरही धावांच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावरच राहील. पहिल्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), ज्याच्या १५,९२१ कसोटी धावा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड. त्याच्या नावावर १३,२६५ धावा जमा आहेत. लिटिल मास्टर सुनील गावसकर १०,१२२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (Ind vs Eng 1st Test)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका २५ जानेवारीपासून हैद्राबाद इथं सुरू होत आहे. पाच सामन्यांची ही मालिका आहे. यापूर्वी इंग्लिश संघ भारतात दोन वर्षांपूर्वी खेळला होता. आणि ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती. २०१२-१३ नंतर भारतीय संघ (Indian team) मायदेशात इंग्लंड विरुद्ध मालिका हरलेला नाही. (Ind vs Eng 1st Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.