Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय

Ind vs Eng, 2nd ODI : बुमरा सध्या बंगळुरूतील क्रिकेट अकादमीच राहणार आहे 

43
Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय
Ind vs Eng, 2nd ODI : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा अहवाल शनिवारी मिळणार? चॅम्पियन्स करंडकातील सहभागावर लवकरच निर्णय
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या उपचारांसाठी बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. आणि त्याच्या पाठीचे स्कॅन अहवाल शुक्रवारी घेण्यात आले आहेत. हे अहवाल नीट तपासल्यानंतर तिथला वैद्यकीय चमू भारतीय संघ प्रशासनाला अंतिम अहवाल सादर करेल असा अंदाज आहे. बुमराहने यापूर्वी न्यूझीलंडमधील जाणकार डॉक्टर रोवान स्कॉटन यांच्याकडून उपचार घेतले आहेत. त्यामुळे त्यांनाही हे स्कॅनचे अहवाल पाठवले जाऊ शकतात. कारण, ऑस्ट्रेलियातील दुखापतीनंतऱ घेतलेले स्कॅनही त्यांना पाठवण्यात आले होते. त्यांचा सल्ला घेतल्यानंतर बीसीसीआयचं पथक आपला अहवाल तयार करेल असा अंदाज आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या चॅम्पियन्स करंडकासाठीच्या उपलब्धतेची ठोस माहिती शनिवारपर्यंत कळू शकेल. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- Worli Adarsh ​​Nagar खंडणी प्रकरणात खडणीखोरामागे राजकीय वरदहस्त असल्याचा वकीलाचा दावा)

चॅम्पियन्स करंडकासाठी संघात बदल करण्याची अंतिम मुदत ही १२ फेब्रुवारी आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत बुमराहऐवजी वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश झाला होता. तर पहिल्या सामन्यात हर्षित राणाला संघ प्रशासनाने संधी दिली. तेव्हाच बुमराच्या अनुपलब्धतेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. कारण, बुमराहच्या अनुपस्थितीत राणाचा फॉर्म पडताळून पाहिला जात असल्याचं तेव्हा बोललं गेलं होतं. (Ind vs Eng, 2nd ODI)

बुमराह उपलब्ध नसेल तर दुबईतील खेळपट्ट्यांसाठी संघात नेमके काय बदल करण्यात येतात याकडे आता लक्ष लागलं आहे. म्हणजे वरुणचा समावेश होतो की हर्षित राणाचा हा मुद्दा आहे. सध्यातरी जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियातील मालिकेत ५ कसोटींत ३२ बळी घेणारा बुमरा शेवटच्या सिडनी कसोटीत मात्र दुसऱ्या डावांत गोलंदाजी करू शकला नव्हता. पहिल्या डावांत गोलंदाजी करताना त्याच्या पाठीत उसण भरली आणि तिथेच त्याची स्कॅन चाचणी घेण्यात आली. त्यानंतर महिनाभर तो खेळलेला नाही.  (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- मिलकीपुर पोटनिवडणुकीत भाजपाचे Chandrabhan Pravasan आघाडीवर; सपा उमेदवार १८ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर)

सध्या बुमराह बंगळुरू इथं क्रिकेट अकादमीतच आहे. आणि तंदुरुस्तीचा अहवाल तयार झाल्यानंतरही तो तिथल्या वैद्यकीय पथकाकडून मार्गदर्शन घेणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आणि भारताचा पहिला सामना २० तारखेला बांगलादेशशी होणार आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.