Ind vs Eng, 2nd ODI : ‘विराट कोहली कटकमध्ये खेळणार’ – शुभमन गिल 

65
Ind vs Eng, 2nd ODI : ‘विराट कोहली कटकमध्ये खेळणार’ - शुभमन गिल 
Ind vs Eng, 2nd ODI : ‘विराट कोहली कटकमध्ये खेळणार’ - शुभमन गिल 
  • ऋजुता लुकतुके 

विराट कोहलीची गुडघ्याची दुखापत फारशी गंभीर नाही आणि कटक एकदिवसीय सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल, असं भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. कोहलीच्या दुखापतीविषयीची अनिश्चितता दूर करण्याचा प्रयत्न गिलने केला आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चाहत्यांना अचानक ही वाईट बातमी मिळाली की, विराट पहिला सामना खेळू शकणार नाहीए. विराटचा डावा गुडघा टेपने बांधलेला दिसत होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना आलेल्या या बातमीमुळे सगळ्यांना जास्त चिंता होती. पण, आता गिलने सध्या तरी चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- मिलकीपुर पोटनिवडणुकीत भाजपाचे Chandrabhan Pravasan आघाडीवर; सपा उमेदवार १८ हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर)

‘सामन्याच्या आदल्यादिवशी विराट बरा होता. अचानक हॉटेलमध्ये परतल्यावर त्याच्या गुडघ्याला सूज आल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण, दुखापत फारशी गंभीर नाही. आणि कटकमध्ये तो नक्की खेळेल,’ असं गिलने डिस्नी हॉटस्टार या मालिकेचं प्रसारण करणाऱ्या कंपनीला सांगितलं. (Ind vs Eng, 2nd ODI)

नागपूरचा पहिला सामना भारतीय संधाने ४ गडी आणि ६८ चेंडू राखून आरामात जिंकला. आणि या सामन्यात ९६ चेंडूंत ८७ धावा करत शुभमनने निर्णायक भूमिका बजावली. त्यालाच सामनावीराचा किताबही देण्यात आला. (Ind vs Eng, 2nd ODI)

८७ धावांवर असताना काहीसा बेजबाबदार फटका खेलून शुभमन बाद झाला. साकिब महमूदचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टोलवण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि उंच उडालेला चेंडू मिडऑनने झेलला. घाई गडबड करून बाद झालेलो नाही, असं शुभमनने या झेलाविषयी सांगितलं. ‘मला शतक लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं. म्हणून तसा फटका खेळलो, असं म्हणणं चुकीचं आहे. मला गोलंदाजावर वर्चस्व गाजवायचं होतं. मी शतकाचा विचारही करत नव्हतो. ६० धावांवर असतो तरीही तसा फटका मी खेळलोच असतो. बाद झालो तो भाग वेगळा,’ असं गिल त्यावर बोलताना म्हणाला. गिलने श्रेयस अय्यरसह तिसऱ्या गड्यासाठी ९४ धावांची भागिदारी केली. पण, दोघं बाद झाल्यावर मधली फळी झटपट बाद झाली. आणि भारताची अवस्था ६ बाद २१३ झाली होती. अखेर जडेजा आणि मोहम्मद शामी यांनी भारताला विजय मिळवून दिला. (Ind vs Eng, 2nd ODI)

(हेही वाचा- Worli Adarsh ​​Nagar खंडणी प्रकरणात खडणीखोरामागे राजकीय वरदहस्त असल्याचा वकीलाचा दावा)

भारतीय संघ आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कटकला दाखल झाला आहे. हा सामना रविवारी होणार आहे. मालिकेत भारताने १-० अशी आघा़डी घेतली आहे.  (Ind vs Eng, 2nd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.