Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी मात, मालिकेत बरोबरी

विशाखापट्टणम कसोटीत विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. 

241
Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी मात, मालिकेत बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

अखेर विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने इंग्लिश संघाचा १०६ धावांनी पराभव करत मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली आहे. युवा फलंदाज यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल यांची शतकं आणि जसप्रीत बुमराचे सामन्यात ९ बळी यामुळे भारतीय संघासाठी विजय सोपा झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २९२ धावांमध्ये आटोपला. (Ind vs Eng 2nd Test)

सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश संघाला विजयासाठी ३३२ धावांची गरज होती. आणि त्यांचे ९ गडी हातात होते. इंग्लंडची रणनीती आताही बॅझ-बॉल क्रिकेटचीच होती. त्यांनी आक्रमक फलंदाजीची कास सोडली नाही. नाईट-वॉचमन म्हणून आलेल्या रेहान अहमदनेही आपले फटके खेळणं सुरूच ठेवलं होतं. पण, अक्षर पटेलने रेहानला (२३) पायचीतच्या जाळ्यात ओढलं. तर अश्विनच्या गोलंदाजीवर ऑली पोपचा (२३) रोहित शर्माने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपला. आक्रमक जो रुटही बाद झाल्यावर भारतीय विजयाची शक्यता निर्माण झाली. (Ind vs Eng 2nd Test)

पण, त्यानंतरही इंग्लिश संघाने आपले फटके खेळण्यावरच भर दिला. आणि अगदी कर्णधार बेन स्टोक्स (११) बाद झाल्यावरही बेन फोक्स (३६) आणि टॉम हार्टली (३६) यांनीही आठव्या गड्यासाठी ५५ धावांची भागिदारी करत इंग्लंडचं आव्हान कायम ठेवलं होतं. अखेर कर्णधार रोहितने गरज असताना प्रत्येक वेळी जसप्रीत बुमराकडे चेंडू दिला. आणि त्याने एकदाही कर्णधाराला निराश केलं नाही. पहिल्या डावात ६ बळी टिपणाऱ्या बुमराने दुसऱ्या डावातही ४६ धावांत महत्त्वाचे ३ बळी टिपले. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : ‘हे’ दोन भारतीय क्रिकेटपटू जागतिक क्रिकेट गाजवतील, विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप)

इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७१ धावा केल्या. तर भारताकडून यशस्वी जयसवालने पहिल्या डालात २०६ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या १०४ धावा निर्णायक ठरल्या. गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विननेही दुसऱ्या डावात ३ बळी टिपत बुमराला चांगली साथ दिली. भारतीय संघाने संतुलित खेळाचं प्रदर्शन करत ही कसोटी जिंकली आहे. आता तिसरी कसोटी १२ फेब्रुवारीपासून रांचीला सुरू होईल. सामन्यात ९ बळी टिपणाऱ्या जसप्रीत बुमराला कसोटीवीराचा पुरस्कार देण्यात आला. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.