Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?

अंगठ्या जवळच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणाला उतरला नाही. 

227
Ind vs Eng 2nd Test : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) हाताच्या बोटाला झालेली दुखापत फारशी गंभीर नसल्याचं म्हटलं आहे. सोमवारी विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशी तो मैदानात उतरला नाही. आणि संघाच्या फीजिओबरोबर तो काही स्कॅन करण्यासाठी बाहेरही गेला होता. त्यामुळे अर्थातच त्याच्या तंदुरुस्तीविषयी शंका घेण्यात येत होती. (Ind vs Eng 2nd Test)

‘पण, स्कॅन्समध्ये फारसं काही गंभीर आढळलं नाही. त्यामुळे २-३ दिवसांत पुन्हा मैदानावर परतेन,’ अशी आशा शुभमनने (Shubman Gill) कसोटी संपल्यानंतर व्यक्त केली आहे. गिलने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी १४७ चेंडूंत १०४ धावा केल्या. या शतकामुळेच भारतीय संघ चौथ्या डावात इंग्लंडसमोर ३९९ धावांचं आव्हान ठेऊ शकला. पण, या खेळी दरम्यानच शुभमनच्या (Shubman Gill) बोटाला थोडी दुखापत झाली. आणि तो तिसऱ्या दिवशीच क्षेत्ररक्षणाला पूर्णवेळ मैदानात नव्हता. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Coastal Road : वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडसाठी हे असे नेमले कंत्राटदार)

गिलने क्षेत्ररक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावली

‘रविवारी दुपारीच मी मैदान सोडलं होतं. कारण, फीजिओनं मला स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला होता. आम्ही त्यासाठी रुग्णालयात गेलो. बोटाला असलेली सूज किती गंभीर आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. पण, दुखापत गंभीर नाही. आणि २-३ दिवसांत मी मैदानावर परतू शकेन,’ असं गिलने (Shubman Gill) कसोटी संपल्यावर टीव्ही प्रसारण वाहिनीला सांगितलं. (Ind vs Eng 2nd Test)

गिलने (Shubman Gill) दुसऱ्या डावातील शतकाबरोबरच आधीच्या डावात क्षेत्ररक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ४ झेल टिपले होते. आणि यातील दोन अवघड होते. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.