- ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या हैद्राबाद कसोटीत भारताला २८ धावांनी अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि त्याचा फटका भारतीय संघाला कसोटी क्रमवारीतही बसला आहे. भारतीय संघ आता बांगलादेशच्याही खाली पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. नंतर ऑस्ट्रेलियाने विंडिज विरुद्धची पहिली कसोटी जिंकून भारताला पुन्हा मागे टाकलं. आता क्रमवारीच्या दृष्टीने भारतासाठी इंग्लंड विरुद्धची पहिली कसोटी महत्त्वाची होती. (Ind vs Eng 2nd Test)
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या उपायुक्ताला सेवानिवृत्ती ऐवजी एक वर्षांची वाढ?)
पण, नेमका भारतीय संघाचा पराभव झाला. गुणांबरोबरच ही क्रमवारी विजयाच्या टक्केवारीतील गुणांवरूनही ठरते. आणि भारतीय संघाचे हे रेटिंग गुण ५४.१६ गुणांवरून थेट ४३.३३ गुणांवर कमी झाले आहेत. (Ind vs Eng 2nd Test)
The latest #WTC25 standings following 24 hours of box office Test match cricket 🎟#AUSvWI #INDvENG pic.twitter.com/YL6C4oJGwQ
— ICC (@ICC) January 29, 2024
ऑस्ट्रेलियन संघ ५५ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. विंडिज विरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत झालेल्या ८ धावांच्या पराभवामुळे त्यांच्या अव्वल स्थानाला धक्का बसलेला नाही. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ ५० रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताच्या खालोखाल पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचा क्रमांक लागतो. (Ind vs Eng 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community