Ind vs Eng 2nd Test : ‘राहुलसर आणि रोहित भाई म्हणाले, शेवटपर्यंत खेळ!’ – यशस्वी जयसवाल

283
Ind vs Eng 2nd Test : ‘राहुलसर आणि रोहित भाई म्हणाले, शेवटपर्यंत खेळ!’ - यशस्वी जयसवाल
Ind vs Eng 2nd Test : ‘राहुलसर आणि रोहित भाई म्हणाले, शेवटपर्यंत खेळ!’ - यशस्वी जयसवाल
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयसवालने (Yashasvi Jaiswal) आंतरराष्ट्रीय कसोटींत (Ind vs Eng 2nd Test) आपलं दुसरं दीड शतक शुक्रवारी पूर्ण केलं. पहिला दिवस संपला तेव्हा तो १७९ धावांवर नाबाद होता. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीत (Ind vs Eng 2nd Test) भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली तेव्हा पोषक वातावरणात जास्तीत जास्त धावा करण्याचाच संघाचा इरादा होता. पण, प्रत्यक्षात कर्णधार रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, शुभमन गिल, अक्षर पटेल आणि कोना भरत हे खेळाडू चांगला जम बसलेला असताना ढिले फटके खेळून बाद झाले. रजत पाटिदार थोडा दुर्दैवी ठरला. आणि रेहान अहमदचा चेंडू तटवल्यावर तो नेमका मागे जाऊन यष्ट्यांवर आदळला. बाकीच्या फलंदाजांनी मात्र आपली विकेट जपून ठेवण्यात कुचराई केली.(Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर)

याला अपवाद ठरला तो डावखुरा यशस्वी जयसवाल.(Yashasvi Jaiswal) ही त्याची फक्त सहावी कसोटी आहे. पण, टिकून राहण्याच्या इराद्याने तरीही खराब चेंडूवर धावा वसूल करण्यात हात आखडता न घेता त्याने २५७ चेंडूंत १७९ धावा केल्या. यात १७ चौकार आणि ५ षटकार होते.(Ind vs Eng 2nd Test)

जे यशस्वीला जमलं (Yashasvi Jaiswal) ते बाकीच्या फलंदाजांना का जमू नये? याचं उत्तर स्वत: यशस्वीनेच सामन्यानंतर मीडियाशी बोलताना दिलं. ‘राहुल सर आणि रोहित भाई मला सतत संदेश पाठवत होते. शेवटपर्यंत खेळ. मग मी ही डावाची तशीच आखणी केली. एकेक सत्र खेळून काढण्याकडे लक्ष दिलं. खराब चेंडूचा समाचार घ्यायचाच. पण, चांगल्या चेंडूचा मानही राखायचा, या तत्त्वाने खेळलो,’ असं यशस्वी म्हणाला.(Ind vs Eng 2nd Test)

हैद्राबादच्या पहिल्या कसोटीत यशस्वी आक्रमक खेळण्याच्या नादात ८० धावांवर बाद झाला होता. पण, ती चूक लगेचच त्याने सुधारली. उलट इतर फलंदाज चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात कमी पडले आहेत. खेळपट्टीबद्दल बोलताना यशस्वीने ती अजूनही फलंदाजीसाठी योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.