Ind vs Eng, 3rd ODI : भारत आणि इंग्लंडचे संघ अहमदाबादमध्ये हिरवी फित घालून का खेळले?

Ind vs Eng, 3rd ODI : बीसीसीआयने ‘अवयव दान करा, जीव वाचवा’ हा उपक्रम सुरू केला आहे.

52
Ind vs Eng, 3rd ODI : भारत आणि इंग्लंडचे संघ अहमदाबादमध्ये हिरवी फित घालून का खेळले?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंडच्या संघातील खेळाडूंनी अहमदाबादमध्ये हाताला हिरव्या फिती गुंडाळल्या होत्या. त्याबद्दल दिवसभर सोशल मीडियावर कुतुहल दिसून आलं. या हिरव्या फितीमागे आहे बीसीसीआयने सुरू केलेला नवीन उपक्रम. ‘अवयव दान करा, जीव वाचवा,’ असं या उपक्रम किंवा मोहिमेचं नाव आहे आणि भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. सामन्याच्या ठिकाणी अवयवदानाविषयी जागृती करण्याबरोबरच इच्छुकांची त्यासाटी नोंदणीही होणार आहे. अहमदाबाद इथं दोन्ही संघातील खेळाडूंनी त्यासाठी सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती केल्या आणि स्वत: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याबरोबरच इतर अनेक पदाधिकारी आणि खेळाडू या मोहिमेत सहभागी झाले.

जय शाह यांच्या हस्ते या आठवड्यात ही मोहीम लाँच करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शाह यांनी तसं ट्विटही केलं होतं. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा – JPC report on Waqf : वक्फ विधेयकावरील अहवाल सादर करतांना विरोधकांचा गोंधळ; सभापतींनी सुनावले खडे बोल)

आता अहमदाबादमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संधातील खेळाडूंनी या विषयासाठी एकत्र फोटो-शूट केलं आणि अवयव दानाच्या बॅनरवर आपल्या स्वाक्षरीही केल्या. ‘समाजासाठी अवयव दानापेक्षा दुसरी मोठी भेट नाही. या भेटीमुळे तुम्ही एखाद्याला नवीन जन्म देऊ शकता,’ असं खेळाडू या मोहिमेदरम्यान लोकांना समजावून सांगत आहेत. सामन्याच्या ठिकाणी अवयव दानाची महती सांगणारे बॅनर लावण्याबरोबरच लोकांच्या शंकांना जाणकार लोकांकडून उत्तरंही देण्यात येणार आहेत. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा – भारताच्या न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक पाऊल; ‘Legal Aid on Wheels’चे होणार उद्घाटन)

‘आयुष्यातील खरं शतक ठोका. तुमच्या आयुष्यानंतरही तुमच्यामुळे दुसरा जीव जगवला जाईल, जगत राहील,’ असं विराट कोहलीने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे. ‘एक दाता आठ जणांचे प्राण वाचवू शकतो. त्यासाठी संकल्प करा आणि खरा षटकार मारा,’ असं श्रेयस अय्यरने आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे. ‘कर्णधार जसा संघाला विजयाकडे नेतो, तसा तुमचा अवयव दानाचा निर्णय एखाद्याला जगण्याकडे नेऊ शकतो,’ असा संदेश रोहितने आपल्या व्हिडिओतून दिला आहे. अहमदाबादमधील सामन्यात २०,००० लोकांनी अवयव दानासाठी अर्ज केला. (Ind vs Eng, 3rd ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.