-
ऋजुता लुकतुके
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०२ चेंड़ूंमध्ये ११२ धावांची सुरेख खेळी साकारली. त्यामुळे भारतीय डावाला चांगली सुरूवात मिळाली. आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन सलामीवीर म्हणूनही आता स्थिरावला आहे. गुरुवारच्या खेळीमुळे शुभमनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,५०० धावाही पूर्ण केल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद हा टप्पा पार करण्याची किमया त्याने केली आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- Jammu and Kashmir : LoC वर पाककडून गोळीबार; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर, अनेक पाकिस्तानी सैनिक ठार)
आपल्या ११२ धावांच्या खेळीत त्याने ३ षटकार आणि १४ चौकार ठोकले. आणि संघाला गरज असताना त्याने आधी विराटबरोबर भागिदारी रचली. आणि त्यानंतर फटकेबाजी सुरू केली. विराट आणि श्रेयसबरोबर त्याने शतकी भागिदारी रचल्या. त्यामुळे लय बिघडू न देता फटकेबाजी करत धावा वाढवण्यात तो यशस्वी झाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
Shubman Gill continues his fine form with a classy ton in Ahmedabad ✨#INDvENG 📝: https://t.co/XiJhARNt87 pic.twitter.com/04rX4FrtC8
— ICC (@ICC) February 12, 2025
शुभमनने या खेळीसह अनेक विक्रम नावावर केले आहेत. एकाच मैदानावर क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावणारा जगातील तो पाचवा फलंदाज आहे. यापूर्वी बाबर आझम (नॅशनल स्टेडिअम), फाफ दू प्लेसिस (वाँडरर्स), डेव्हिड वॉर्नर (ॲडलेड ओव्हल) आणि क्विंटन डी कॉक (सुपरस्पोर्ट्स पार्क) इथं ही किमया साध्य केली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आहे. तसंच गिलचा हा ५० वा एकदिवसीय सामना होता. आणि पन्नासाव्या सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- AI तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती ; मंत्री Nitesh Rane यांचे वक्तव्य)
५० डावांमध्ये त्याचं हे सातवं शतक आहे. तर इतक्या कमी डावांत २,५०० एकदिवसीय धावा पूर्ण करून जलद २,५०० धावांचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)
Jubilation as @ShubmanGill gets to a fine CENTURY!
Keep at it, young man 🙌🙌
Live – https://t.co/S88KfhFzri… #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Xbcy6uaO6J
— BCCI (@BCCI) February 12, 2025
गिलने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत २ अर्धशतकं आणि १ शतक ठोकलं आहे. ३ सामन्यांत ८६ धावांच्या सरासरीने त्याने एकूण २५९ धावा केल्या. आता चॅम्पियन्स करंडकासाठी तयार असल्याचं ऐलानच त्याने केलं आहे. तिथेही यशस्वी जयसवालच्या अनुपस्थितीत तो सलामीला येणार आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community