![Ind vs Eng, 3rd ODI : ‘मैदानावर उतरून आपला नैसर्गिक खेळ करा,’ - रोहित शर्माने सांगितलं भारतीय विजयाचं गमक Ind vs Eng, 3rd ODI : ‘मैदानावर उतरून आपला नैसर्गिक खेळ करा,’ - रोहित शर्माने सांगितलं भारतीय विजयाचं गमक](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-13T104340.722-696x377.webp)
-
ऋजुता लुकतुके
इंग्लिश संघावर तीनही सामन्यांत वर्चस्व गाजवत भारतीय संघाने मालिकाही ३-० ने जिंकली आहे. तिसऱ्या अहमदाबाद सामन्यात इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि संघाचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोण यावर भाष्य केलं. चॅम्पियन्स करंडकापूर्वी मिळालेली सरावाची एकमेव संधी भारतीय संघाने साधली आहे. आणि फलंदाज तसंच गोलंदाजांनीही आपलं काम फत्ते केलं. विराट, रोहितसह शुभमन, राहुल, श्रेयस या सर्व फलंदाजांना सूर गवसला. तर गोलंदाजीत ३ पैकी २ सामन्यांत इंग्लिश संघ सर्वबाद झाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- Tiger Death : भंडाऱ्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत, दुसरा बछडा जिवंत ; वाघीण न दिसल्याने शिकारीचा संशय)
सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात रोहीतने या यशाचं गमक सांगितलं. ‘ड्रेसिंग रुममध्ये काहीसं मुक्त वातावरण आहे. प्रत्येक खेळाडूने मैदानात उतरून आपला नैसर्गिक खेळ करण्यावर भर द्यावा यासाठी आम्ही खेळाडूंना प्रोत्साहन देत आहोत. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक हे त्याचं नेमकं उदाहरण आहे. आताही आम्ही तेच करत आहोत. दरवेळी ही रणनीती यशस्वी होईलच असं नाही. पण, त्याने काही बिघडत नाही,’ असं रोहितत म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
𝐂𝐋𝐄𝐀𝐍 𝐒𝐖𝐄𝐄𝐏
Yet another fabulous show and #TeamIndia register a thumping 142-run victory in the third and final ODI to take the series 3-0!
Details – https://t.co/S88KfhFzri… #INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZoUuyCg2ar
— BCCI (@BCCI) February 12, 2025
या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियातील पराभवाचं सावट भारतीय संघ जिथे जाईल तिथे त्यांच्याबरोबर होतं. मुख्य खेळाडूंच्या खराब फॉर्मची चर्चा होती. पण, आता संघ पुन्हा स्थिरस्थावर होत असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. ‘संघाच्या कामगिरीबरोबरच खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचंही मला समाधान वाटतं. कारण, चॅम्पियन्स करंडकापूर्वी ते महत्त्वाचं होतं. त्यातूनच संघ जुळून येत असतो. या मालिकेत परीक्षेचे क्षण आले. पण, आम्ही आव्हानांना पुरून उरलो,’ असं रोहित याविषयी बोलताना म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
Captain @ImRo45 is presented the winners trophy by ICC Chairman, Mr @JayShah as #TeamIndia clean sweep the ODI series 3-0 👏👏
#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1XaKksydw9
— BCCI (@BCCI) February 12, 2025
आता भारतीय संघासमोर चॅम्पियन्स करंडकाचं आव्हान आहे. आणि त्या स्पर्धेपूर्वी संघ म्हणून काही गोष्टींवर काम करण्यात येणार आहे. पण, त्या गोष्टी जाहीरपणे सांगायला रोहीतने नकार दिला. ‘अर्थात, काही गोष्टींवर आमचा भर असणार आहे. त्यावर आम्ही संघ म्हणून काम करू. पण, त्या गोष्टी मी इथे सांगणार नाही. आम्हाला संघ म्हणून पुढे पुढे जायचं आहे. आणि अधिकाधिक प्रगती करायची आहे. त्यासाठी संघात सातत्य हवं,’ असं रोहीत म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)
ON A ROLL!
For his excellent knock of 112 runs, @ShubmanGill is adjudged Player of the Match.
Scorecard – https://t.co/S88KfhG7gQ… #INDvENG @IDFCFIRSTBank #TeamIndia pic.twitter.com/u8ahP11nbm
— BCCI (@BCCI) February 12, 2025
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली सुरुवात मिळूनही त्याचा फायदा उचलू न शकलेला शुभमन गिल या मालिकेत फॉर्ममध्ये होता. २ अर्धशतकं आणि १ शतक झळकावत त्याने मालिकावीराचा किताबही जिंकला. ३ सामन्यांत त्याने ८९ धावांच्या सरासरीने २५९ धावा केल्या. आणि या कामगिरीवर तो समाधानी होता. ‘अहमदाबादची खेळपट्टी खेळायला अगदी सोपी नव्हती. सुरुवातीला तेज गोलंदाजांना चांगली साथ मिळत होती. त्यामुळे मी आणि विराटने धावफलक हलता ठेवण्याचंच धोरण ठेवलं होतं. मग हळू हळू आम्ही मोकळेपणाने खेळू लागलो. आव्हानात्मक परिस्थितीत केलेलं शतक म्हणून या शतकाचं मोल नेहमीच असेल,’ असं शुभमनने बोलून दाखवलं. (Ind vs Eng, 3rd ODI)
𝟭 𝗰𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝘆
𝟮 𝗵𝗮𝗹𝗳-𝗰𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝗶𝗲𝘀
𝟮𝟱𝟵 𝗿𝘂𝗻𝘀 𝗮𝘁 𝟴𝟲.𝟯𝟯@ShubmanGill wins the Player of the Series award for his dominating show with the bat. #TeamIndia #INDvENG pic.twitter.com/nMoQoPqC25— BCCI (@BCCI) February 12, 2025
श्रेयस अय्यरही या मालिकेत चमकला. त्याने दोन अर्धशतकं आणि पहिल्या सामन्यात बहुमोल ४६ धावा केल्या. संघातील सकारात्मक वातावरणामुळे खेळताना ऊर्जा मिळत असल्याचं श्रेयस म्हणाला. गेल्या हंगामात श्रेयसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. त्यामुळे अगदी आयपीएलमध्ये कोलकाता फ्रँचाईजीने त्याला आपल्याकडे कायम ठेवलं नाही. बीसीसीआयबरोबर रणजी सामना न खेळल्यामुळेही त्याचा वाद झाला. आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यामुळे जाता आलं नाही. त्यानंतर मात्र आता श्रेयसने देशांतर्गत हंगाम गाजवला आहे. आणि भारतीय संघात पुन्हा स्थानही मिळवलं आहे. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून त्याने जागा पटकावली आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community