Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यातही आताचा संघ कायम हवा – संजय बांगर

Ind vs Eng, 3rd ODI : अंतिम अकरा खेळाडूंमध्ये आता फारसे बदल नकोत, असं बांगरने सुचवलं आहे

47
Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यातही आताचा संघ कायम हवा - संजय बांगर
Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यातही आताचा संघ कायम हवा - संजय बांगर
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आहे. आणि उर्वरित सामना ११ फेब्रुवारीला अहमदाबादला होणार आहे. मालिका आधीच जिंकली असल्यामुळे संघात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मनात येऊ शकतो. पण, संघाचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे. आताचा जमून आलेला संघच तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवावा असं बांगर यांना वाटतं. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा- मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश )

‘संघाला सातत्य महत्त्वाचं असतं. आणि संघात बदल झाला तर ते सातत्य जातं. सातत्य नियमित खेळल्याने येतं. आता जो शुभमन गिल चांगला खेळतोय, त्याला अचानक विश्रांती दिली तर त्याची लय पूर्वी सारखी राहणार नाही. त्यामुळे असे कुठलेही बदल संघात नकोत,’ असं मत शुभमनचं उदाहरण देत बांगरने सुचवलं आहे. शुभमन गिलने दोन्ही सामन्यांत अर्धशतक ठोकलं आहे. तर रोहित शर्मालाही कटकमध्ये सूर गवसला आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यरही चांगली फलंदाजी करत आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

पण, संघातील रिषभ पंत, यशस्वी जयसवाल, अर्शदीप सिंग यांना त्यामुळे खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर वॉशिंग्टन सुंदरलाही आजमावता आलेलं नाही. हे खरं असलं तरी बदल करण्याची ही वेळ नाही असं बांगरला वाटतं. ‘यशस्वी जयसवालला खेळवलंच पाहिजे असं नाही. गरज पडली तर अर्शदीप किंवा रिषभचा विचार होऊ शकतो. पण, एकच सामना उरलेला असताना खरंतर बदल नकोतच. अंतिम अकरा जणांचा संघ कायम ठेवण्यातच संघाचं हित आहे. के एल राहुल चांगलं यष्टीरक्षण करतोय. आणि फलंदाजीची पुरेशी संधी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्यावर विश्वास दाखवावा लागेल,’ असं बांगर जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाले. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा – मुरलीधरन )

भारतीय संघाने या मालिकेतील पहिले दोन सामने आरामात जिंकले आहेत. दुसरी फलंदाजी करण्याचं आव्हानही भारतीय संघाने सहज पेललं. आणि त्यातून संघाचं वर्चस्व लक्षात येतं. त्यामुळेच चॅम्पियन्स करंडकासारखी स्पर्धा समोर असताना भारताने फलंदाजीचा क्रम किंवा अगदी गोलंदाजांमध्येही फारसे बदल करू नयेत असं संजय बांगर यांना वाटतं. (Ind vs Eng, 3rd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.