-
ऋजुता लुकतुके
इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गाजवल्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला अगदी फास्ट-ट्रॅक करून एकदिवसीय संघातली घेतलं गेलं. टी-२० मघ्ये त्याने एका सामन्यात ५ बळींसह एकूण १४ बळी मिळवले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्घ दुसऱ्या कटक सामन्यात वरुणला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली. तेव्हाच कर्णधार रोहितने तो चॅम्पियन्स करंडकासाठीही संघात येऊ शकतो, असं म्हटलं होतं. आणि ते वक्तव्यही खरं ठरलं. दुसऱ्याच दिवशी निवड समितीने चॅम्पियन्स करंडकात दोन बदल केले. त्यातील एक बदल होता यशस्वी जयसवालच्या जागी वरुण चक्रवर्तीची झालेली निवड. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- सामाजिक माध्यमे, डिजिटल मिडिया आणि ‘ओटीटी’ यांच्यासाठी कठोर कायदा करा; Naresh Mhaske यांची मागणी)
वरुणकडे संघ प्रशासन बळी मिळवणारा गोलंदाज म्हणून पाहतं. आणि अशावेळी एका सामन्यात पदार्पण झाल्यानंतर लगेचच पुढच्या अहमदाबाद सामन्यात वरुण संघातून गायब झाला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. नाणेफेकीच्या वेळी रोहितने मोघमच सांगितलं की, ‘तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.’ म्हणजे नेमकं काय याचा उलगडा आता झाला आहे. तंदुरुस्तीच्या कारणामुळे वरुण हा सामना खेळू शकला नाही. (Ind vs Eng, 3rd ODI)
वरुणच्या उजव्या पायाची पोटरी गुरुवारी सकाळी सुजली होती. त्यामुळे तो हा सामना खेळू शकला नाही. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शामी यांना विश्रांती दिली. आणि त्यांच्याजागी संघात अर्शदीप आणि वॉशिंग्टन सुंदर आले. पण, वरुण धवन दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आणि त्याच्या जागी मग कुलदीप यादवला खेळवण्यात आलं. (Ind vs Eng, 3rd ODI)
UPDATE: Varun Chakaravarthy was unavailable for selection for the 3rd ODI due to a sore right calf. #TeamIndia #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 12, 2025
तिसरा सामना सुरू झाल्यानंतर बीसीसीआयनेही ट्विट करून वरुण उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं. आणि यात त्याच्या उजव्या पायाची पोटरी दुखावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ३३ वर्षीय वरुणला ‘रहस्यमय फिरकी’साठी ओळखलं जातं. आयपीएलमध्ये मागचे दोन हंगाम त्याची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. आणि तिथून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. कोलकाता नाईटरायडर्स संघाच्या विजेतेपदातही त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भारताच्या टी-२० आणि मग एकदिवसीय संघात त्याचा समावेश झाला आहे. कटकमध्ये त्याला रवींद्र जाडेजाच्या हस्ते भारतीय संघाची कॅप देण्यात आली तेव्हा वरुण भावूक झाला होता. भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण करणारा तो वयाने दुसरा ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे. फारुख इंजिनिअर यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं होतं. (Ind vs Eng, 3rd ODI)
(हेही वाचा- Ind vs Eng, 3rd ODI : ‘मैदानावर उतरून आपला नैसर्गिक खेळ करा,’ – रोहित शर्माने सांगितलं भारतीय विजयाचं गमक )
इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही वरुणचं कौतुक केलं आहे. ‘आम्हाला फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज संघात हवा होता, म्हणून वरुणचा संघात समावेश केल्याचं’ त्यांनी पत्रकारांना सांगितलं. १५ तारखेला भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होईल. (Ind vs Eng, 3rd ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community