Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?

Ind vs Eng, 3rd ODI : इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जडेजा सातत्यपूर्ण गोलंदाजी करत आहे

41
Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?
Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?
  • ऋजुता लुकतुके 

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जडेजाने पहिल्या दोन्ही सामन्यांत अष्टपैलू कामगिरी केली आहे. तर मधल्या षटकांमध्ये त्याची फिरकीही प्रभावी ठरताना दिसतेय. वर्षभरानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत असलेल्या जडेजाने या कामगिरीचं श्रेय देशांतर्गत क्रिकेटला दिलं आहे. आताच्या मालिकेपूर्वी जडेजा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त कसोटी आणि टी-२० सामनेच खेळला आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा- मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश )

पण, ऑस्ट्रेलियातून परतल्यावर तो सौराष्ट्र संघाकडून २ रणजी सामने खेळला. आणि त्यामुळे भारतीय वातावरणात पुन्हा लय सापडल्याचं जडेजाचं म्हणणं आहे. पहिल्या नागपूर सामन्यातही जडेजाने ९ षटकांत २६ धावा देत ३ बळी मिळवले होते. आणि नंतर फलंदाजी करताना १२ धावांवर नाबाद राहिला होता. तेव्हा संघाला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने ते योगदानही मोलाचं होतं. तर कटक इथं त्याने पुन्हा एकदा गोलंदाजीत ३ बळी मिळवले. तर ११ धावांवर तो नाबाद राहिला. (Ind vs Eng, 3rd ODI)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतणं आणि पहिल्याच सामन्यात संघासाठी चांगली कामगिरी करणं याचा आनंद जडेजाने सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. (Ind vs Eng, 3rd ODI)

 जडेजाने या कामगिरीचं श्रेय रणजी सामन्यातील अनुभवाला दिलं. ‘रणजी सामन्यात मी प्रत्येक डावांत ३० षटकं गोलंदाजी केली. त्यामुळे मला गोलंदाजीची लय सापडली. अगदी ऑस्ट्रेलियातही इतकी गोलंदाजी वाट्याला आली नव्हती. त्याचा मला उपयोग झाला. ही एकदिवसीय मालिका असली तरी दिशा आणि टप्पा तोच होता. आणि त्यावरच मला बळी मिळाले. रणजी सामन्यामुळे गोलंदाजीत खंडही पडला नाही. आणि या सगळ्याचा फायदा नक्कीच मला होतो आहे,’ असं जडेजा म्हणाला. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा – मुरलीधरन )

जडेजा दिल्ली आणि आसामविरुद्ध दोन रणजी सामने खेळला. आणि यात पहिल्या सामन्यात तर त्याने १२ बळी मिळवत दिल्लीविरुद्ध सौराष्ट्रला मोठा विजयही मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. आणि ७६ धावा केल्या. अलीकडे बीसीसीआयने स्टार खेळाडूंना रणजी सामने खेळणं अनिवार्य केलं असताना जडेजाने या निर्णयातील सकारात्मकता समोर आणली आहे. (Ind vs Eng, 3rd ODI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.