Ind vs Eng, 3rd T20 : ‘मोहम्मद शमी तंदुरुस्त आहे पण…’ प्रशिक्षकांनी सांगितलं शमीला न खेळवण्याचं कारण

शमीला खेळवायचं की नाही हा कर्णधार व प्रशिक्षकाचा निर्णय असल्याचं कोटक म्हणाले.

58
Ind vs Eng, 3rd T20 : ‘मोहम्मद शमी तंदुरुस्त आहे पण…’ प्रशिक्षकांनी सांगितलं शमीला न खेळवण्याचं कारण
Ind vs Eng, 3rd T20 : ‘मोहम्मद शमी तंदुरुस्त आहे पण…’ प्रशिक्षकांनी सांगितलं शमीला न खेळवण्याचं कारण
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्घ इंग्लंड तिसऱ्या टी-२० (Ind vs Eng, 3rd T20) लढतीच्या पूर्वसंध्येला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे, ती म्हणजे मोहम्मद शमी (Mohammed Shami) पूर्णपणे तंदुरुस्त आहे. भारतीय संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक सितांशू कोटक (Shitanshu Kotak) यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. आणि त्याचबरोबर हे ही स्पष्ट केलं आहे की, त्याला खेळवायचं की नाही, हा निर्णय सर्वस्वी कर्णधार व मुख्य प्रशिक्षकांचा असेल असंही कोटक (Shitanshu Kotak) यांनी स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, टी-२० संघाच्या रचनेत एकच तेज गोलंदाज खेळवायचा असेल तर शमी संघात बसत नाही.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) नोव्हेंबर २०२३ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या दुखऱ्या घोट्यावर त्याने शस्त्रक्रियाही करून घेतली. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये १३ सामने खेळल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. पण, पहिल्या दोन टी-२० सामन्यांत त्याची निवड न झाल्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीविषयी सवाल उपस्थित केले जात होते. आता निदान तो प्रश्न मिटला आहे.

(हेही वाचा – Saif Ali Khan Attack : मी नोकरी आणि छोकरी गमावली, पोलिसांमुळे माझ्या जीवनात संकटे आली; कनोजियाचा आरोप)

इंग्लंड विरुद्ध तिसरा टी-२० (Ind vs Eng, 3rd T20) सामना राजकोटला होणार आहे. आणि नितिश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. अशावेळी कदाचित मंगळवारच्या सामन्यात शमीचा (Mohammed Shami) विचार होऊ शकतो. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध आणखी ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. आणि त्यानंतर लगेचच चॅम्पियन्स करंडकाला सुरुवात होईल. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी शमीला सामन्याचा सराव मिळणंही आवश्यक आहे.

‘शमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आणि त्याच्यासाठीची योजनाही तयार आहे. इंग्लंड विरुद्‌ध काही सामने तो नक्की खेळेल. पण, नेमका कधी हे सांगणं माझं काम नाही. ते कर्णधार किंवा प्रशिक्षकाने सांगावं,’ असं कोटक पत्रकार परिषदेत म्हणाले.

शमीच्या (Mohammed Shami) तंदुरुस्तीविषयी सतत चर्चा सुरू आहे. त्याला बोर्डर – गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवणार अशीही चर्चा होती. पण, अचानक गोलंदाजीनंतर शमीचा गुडघा सुजायला लागला. त्यामुळे शमीचं पुनरागमन मात्र लांबलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.