- ऋजुता लुकतुके
शोएब बशीर नंतर इंग्लंडचा आणखी एक फिरकी गोलंदाज रेहान अहमदलाही राजकोटच्या हिरासर विमानतळावर थांबवण्यात आल्याची बातमी आहे. इंग्लिश संघ १० दिवस आबूधाबीमध्ये सुटीसाठी गेला होता. आणि तिथून परतताना रेहानला विमानतळावर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अडवण्यात आलं. स्टारस्पोर्ट्स साप्ताहिकाने ही बातमी दिली आहे. रेहानकडे सिंगल एंट्री व्हिसा होता. त्यामुळे त्याला अडवण्यात आल्याचं समजतंय. (Ind vs Eng 3rd Test)
यापूर्वी शोएब बशीरलाही आबूधाबीहून कागदपत्रांची पूर्तता आणि भारतीय दूतावासातील प्रक्रियेसाठी लंडनला परतावं लागलं होतं. तो पहिली कसोटीही खेळू शकला नव्हता. शोएब आणि रेहान हे पाकिस्तानी वंशाचे इंग्लिश नागरिक आहेत. आणि पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा मिळण्यासाठी त्यांना अतिरिक्त कागदपत्रं आणि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगीही लागते. (Ind vs Eng 3rd Test)
स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या बातमीनुसार, रेहानची अडचण अजून थांबलेली नाही. सध्या स्थानिक प्रशासनाने त्याला २ दिवसांचा व्हिसा देऊ केला आहे. आणि इंग्लिश संघ प्रशासनाला इंग्लिश दूतावासाशी संपर्क करून दीर्घ मुदतीचा व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यात सांगण्यास आलं आहे. आणि त्यासाठी त्याच्याकडे आता २ दिवस आहेत. (Ind vs Eng 3rd Test)
(हेही वाचा – Pune Cab Drivers Strike : पुण्यात कॅबचालकाचे २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, कशासाठी ? वाचा सविस्तर)
भारतानेही रेहानला भारतात येऊ दिलं
रेहानकडे सिंगल एंट्री व्हिसा असल्यामुळे आबूधाबीला गेल्यावर परत भारतात येताना त्याला अडचणी आल्या. ‘इंग्लिश संघ प्रशासनाला रेहानच्या व्हिसासाठी पुन्हा एकदा अर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. आणि ही प्रक्रिया येत्या २ दिवसांत पूर्ण होईल अशी आशा आहे. तोपर्यंत रेहान भारतात मुक्तपणे राहू शकतो. आणि सरावातही सहभागी होऊ शकतो,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पोर्ट्सस्टारला सांगितलं आहे. (Ind vs Eng 3rd Test)
इंग्लिश संघ पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पाकिस्तानी वंशाच्या शोएबलाही व्हिसा अडचणी आल्या होत्या. आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्याला लंडनला परतावं लागलं. त्यानंतर इंग्लंडमध्येही हे प्रकरण गाजलं होतं. आणि पंतप्रधान कार्यालयानेही भारताला इंग्लिश नागरिकांना व्हिसासाठी अडवल्याचा आरोप करत सुनावलं होतं. त्यानंतर रेहान अहमदच्या वेळी दोन्ही देशांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. आणि भारतानेही रेहानला भारतात येऊ दिलं आहे. (Ind vs Eng 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community