Ind vs Eng 3rd Test : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेल आणि सर्फराझ यांचं पदार्पण जवळ जवळ निश्चित

दुखापतींमुळे महत्त्वाचे खेळाडू मालिकेत खेळत नसल्याने ध्रुव आणि सर्फराजकडे पदार्पणाची संधी आहे

259
Ind vs Eng 3rd Test : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेल आणि सर्फराझ यांचं पदार्पण जवळ जवळ निश्चित

ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धची तिसरी राजकोट (Ind vs Eng 3rd Test) कसोटी एका दिवसावर आलेली असताना भारतीय संघात कुठल्या दिशेने वारे वाहत आहेत याचा स्पष्ट अंदाज येतो आहे. महत्त्वाचे खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्यामुळे एक सोडून दोन नवीन खेळाडूंना राजकोटमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. भारतीय संघ प्रशासनाची भूमिका नवीन खेळाडूंना संधी देण्याचीच दिसतेय. तसं झालं तर पदार्पण करणारे हे खेळाडू असतील यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल आणि मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटिदार.

(हेही वाचा – Financial Crime Branch : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेकडून शिवसेनेच्या तक्रार अर्जाची दखल)

शुभमन गिलच्या बोटाला दुखापत –

मंगळवारी भारतीय खेळाडूंसाठी वैकल्पिक सराव सत्र होतं. आणि शुभमन गिल तिथं हजर नव्हता. दुसऱ्या कसोटीतील शतकवीर शुभमनला क्षेत्ररक्षण करताना बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नसली तरी काळजीची बाब म्हणून त्याला हॉटेलमध्येच बसवण्यात आल्याचं समजतंय. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar Case : जगाला दाखवून देण्यासाठी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केल्याची शक्यता; अंगरक्षकाला न्यायालयीन कोठडी)

सरावात गांभीर्य –

राहुल आणि श्रेयस अय्यरही सराव सत्रात नव्हते. अशावेळी सगळ्यांचा नजरा होत्या त्या सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेलवर. दोघांनी फलंदाजीचाही कसून सराव केला. तिसऱ्या कसोटीत दोघांच्या नावाचा विचार नक्की होऊ शकतो, याची कल्पना दोघांना आहे. त्यामुळे त्यांच्या सरावातही गांभीर्य दिसलं. कर्णधार रोहीत शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचंही दोघांवर सकारात्मक लक्ष होतं. (Ind vs Eng 3rd Test)

दुखापतींचा ससेमिरा मागे –

एरवी भारतीय संघ घरच्या मैदानावर शेर असतो. आणि खासकरून फलंदाजीत संघासमोर अनेक पर्याय असतात. पण, यंदा दुखापतींचा ससेमिरा मागे लागलेला असताना आणि विराट, रोहीत, अश्विन हे प्रमुख खेळाडू पचतिशीत असताना संघ स्थित्यंतराच्या अवस्थेत आहे. अशावेळी पहिल्यांदाच भारताचे ४ ते ७ क्रमांकाचे फलंदाज हे जास्ती जास्त १ कसोटी सामना खेळलेले असणार आहेत. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केली ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची घोषणा)

युवा खेळाडूंना संधी –

पण, निवड समितीची भूमिका स्पष्ट आहे. युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देऊन, त्यातून नवीन भारतीय संघ त्यांना घडवायचा आहे. आणि रणजी सामने खेळल्याशिवाय राष्ट्रीय संघात खेळण्याची संधीही त्यांनी खेळाडूंना द्यायची नाहीए. त्यामुळेच राहुल द्रविड यांनी अगदी ज्येष्ठ फलंदाज श्रेयस अय्यरलाही रणजी खेळायला सुनावलं होतं. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – 70th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव वगळण्यात आले)

मंगळवारचा दिवस हा क्षेत्ररक्षणाच्या सरावाचाही होता. कारण, पाटिदार आणि सर्फराझ यांनाच आता स्लिपमध्ये उभं राहायचं आहे. तसंच फिरकी गोलंदाजांना जवळ उभं राहून क्षेत्ररक्षण करायचं आहे. दोघांनी आणि बरोबर ध्रुव जुरेलने तसा सराव केला. आणि राहुल द्रविड यांनी जातीने उभं राहत तो पाहिला. या सगळ्या हालचालींमुळे सर्फराझ आणि ध्रुव यांचा संघात समावेश नक्की मानला जातोय. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.