Ind vs Eng 3rd Test : सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमला निरंजन शाह यांचं नाव

भारतीय क्रिकेटचे प्रशासक अशी ओळख असलेल्या निरंजन शाह यांनी सौराष्ट्र क्रिकेटसाठी योगदान दिलं आहे. 

178
Ind vs Eng 3rd Test : सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमला निरंजन शाह यांचं नाव
  • ऋजुता लुकतुके

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमला बुधवारी निरंजन शाह यांचं नाव देण्यात आलं. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या या सोहळ्याला भारत तसंच इंग्लिश संघ आणि भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही उपस्थित होते. सौराष्ट्रकडून खेळून भारतीय संघापर्यंत मजल मारलेल्या रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. इतकंच नाही तर सौराष्ट्र संघाला रणजी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचाही यावेळी सुनील गावसकर आणि अनिल कुंबळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Yerawada Jail : आंदेकर टोळीचा राडा; १२ कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण)

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील फिनिक्स संघ

आधी रणजीच्या प्लेट गटातही अडखळत खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने अलीकडे दोनदा रणजी विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील फिनिक्स संघ अशी त्यांची ओळख आहे. चेतेश्वर पुजारा या सौराष्ट्रच्या महत्त्वाच्या खेळाडूने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अलीकडेच २०,००० धावांचा टप्पाही ओलांडला. (Ind vs Eng 3rd Test)

आणि खेळाडूंची ही फळी घडवण्यात निरंजन शाह यांचा मोठा वाटा आहे. स्वत: १९६५ ते ७५ च्या काळात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १२ कसोटी सामने खेळलेले निरंजन शाह प्रशासक म्हणून अधिक गाजले. बीसीसीआयचे सचिव म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. म्हणूनच त्यांच्या मृत्यू पश्चात सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमच्या नुतनीकरणानंतर त्याला निरंजन शाह यांचं नाव देण्यात आलं आहे. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.