Ind vs Eng, 4th T20 : हर्षित राणाचा अनोखा विक्रम, टी-२० पदार्पण कन्कशन खेळाडू म्हणून, घेतले ३ बळी 

Ind vs Eng, 4th T20 : हर्षित राणासाठी पुण्यातील टी-२० सामना यादगार ठरला

50
Ind vs Eng, 4th T20 : हर्षित राणाचा अनोखा विक्रम, टी-२० पदार्पण कन्कशन खेळाडू म्हणून, घेतले ३ बळी 
Ind vs Eng, 4th T20 : हर्षित राणाचा अनोखा विक्रम, टी-२० पदार्पण कन्कशन खेळाडू म्हणून, घेतले ३ बळी 
  • ऋजुता लुकतुके

पुण्यात इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेतील चौथा टी-२० सामना सुरू झाला तेव्हा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये हर्षित राणाचं नाव नव्हतं. भारताची फलंदाजी संपून गोलंदाजी सुरू झाली तेव्हा अचानक त्याची मैदानावर एंट्री झाली. त्याचं हे टी-२० पदार्पणच होतं. आणि त्यातही कारकीर्दीतील दुसऱ्या चेंडूवर त्याने बळी मिळवला. लिअम लिव्हिंगस्टोनने हलकेच चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात दिला. हे सगळं हर्षितसाठी स्वप्नवतच होतं. कारण, मूळातच जसप्रीत बुमरा जायबंदी असल्यामुळे बदली खेळाडू म्हणून त्याला या मालिकेत संधी मिळाली. त्यातही चौथ्या टी-२० सामन्यांत अर्ध्यातून त्याने पदार्पण केलं. आणि ४ षटकांत ३३ धावा देत त्याने ३ बळीही मिळवले. (Ind vs Eng, 4th T20)

(हेही वाचा- Pendrive Bomb : फडणवीस आणि शिंदेंच्या अटकेचा कट; मविआ सरकारच्या कटाच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत)

हे सगळं घडलं आयसीसीच्या नवीन कन्कशन नियमामुळे.

भारतीय डाव सुरू असताना डावखुरा फलंदाज शिवम दुबेच्या डोक्यावर जेमी ओव्हरटनचा चेंडू बसला. अशावेळी मैदानातील पंच तातडीने फिजीओला पाचारण करतात, तसा नियमच आहे. आणि मग डोक्याला दुखापत झाली असेल तर उपचारांना वेळ मिळावा म्हणून अशावेळी संघाला बदली खेळाडू घेण्याची मुभा असते. त्या खेळाडूला अधिकृतपणे म्हणतात, कन्कशन बदली खेळाडू. आणि या नियमाचा वापर करत मुख्य प्रशिक्षक गंभीरने हर्षित राणाला मैदानात उतरवलं. त्यानेही कमाल केली. शेवटचा धोकादायक खेळाडू जेमी ओव्हरटनला बाद करून त्याने इंग्लिश फंलदाजीची उरलीसुरली धुगधुगीही संपवली. (Ind vs Eng, 4th T20)

हर्षितचा हा पहिलाच टी-२० सामना होता. आणि यात त्याने दुसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद केलं. आणि त्यानंतर जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन हे महत्त्वाचे बळीही मिळवले. त्यामुळे डगआऊटमध्ये बसलेल्या गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर वेगळंच हसू होतं. लिव्हिंगस्टोनच्या बळीमुळे भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतर सामन्यात पुनरागमन केलं. (Ind vs Eng, 4th T20)

हर्षितच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला. कन्कशन बदली खेळाडू म्हणून टी-२० पदार्पण करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. २०२० मध्ये हा नियम लागू झाल्यानंतर हर्षित धरून एकूण ७ खेळाडूंनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये अशाप्रकारे पदार्पण केलं आहे. यापैकी चार कसोटी तर २ एकदिवसीय सामने होते. (Ind vs Eng, 4th T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.