Ind vs Eng, 4th T20 Series : पुण्यातील टी-२० वर जीबीएसचं सावट, बीसीसीआय घेणार ही विशेष काळजी

Ind vs Eng, 4th T20 Series : पुण्यातील सामन्यापूर्वी बीसीसीआयने पुणे महानगरपालिकेशी चर्चा केली

43
Ind vs Eng, 4th T20 Series : पुण्यातील टी-२० वर जीबीएसचं सावट, बीसीसीआय घेणार ही विशेष काळजी
Ind vs Eng, 4th T20 Series : पुण्यातील टी-२० वर जीबीएसचं सावट, बीसीसीआय घेणार ही विशेष काळजी
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंड दरम्यानचा मालिकेतील चौथा टी-२० सामना पुण्यात होणार आहे. आणि शहरात सध्या गुलेन बॅरीज सिंड्रोम (जीएसबी) रोगाची साथ दिसून येत आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही या गोष्टीची दखल घेतली आहे. दोन्ही संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ तसंच मैदानावर येणारे प्रेक्षक यांच्यासाठी बीसीसीआयने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवाय पुणे महानगरपालिकेबरोबरच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. (Ind vs Eng, 4th ODI)

(हेही वाचा- PM Narendra Modi यांच्या घराविषयीचा फेक व्हिडिओ आपकडून प्रसारित; अलिशान घरातील वस्तूंच्या दाखवल्या किमती)

स्टेडिअम जवळच्या पाण्याच्या स्त्रोतांमधील पाण्याची तपासणी हाती घेण्यात आली होती. त्यानंतर स्टेडिअममध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढवण्यात आली आहे. तसंच इथलं पाणी तीनदा फिल्टर होणार आहे. या सामन्यासाठी परदेशातूनही हजारो प्रेक्षक येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जीबीएस चा प्रादुर्भाव वाढणार नाही या अनुषंगाने राज्य सरकारने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत तीन-तीन वेळा फिल्टर करून वापरला जाणार आहे. तर मैदानावरील गवत आणि खेळपट्टीवरही शुद्ध पाण्याची फवारणी होणार आहे. स्टेडिअमवर लोकांच्या माहितीसाठी काही सूचना लावण्यात आल्या आहेत. यात पुढील गोष्टींचा समावेश आहे, (Ind vs Eng, 4th ODI)

पाणी उकळून व गाळून प्यावे.

उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.

अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे. दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.

संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.

काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.

याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते. 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.