-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. आणि यातील चौथा सामना शुक्रवारी पुण्यात होणार आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. आणि हा सामना जिंकून मलिका खिशात घालण्याची संधी भारताकडे आहे. पण, त्याचबरोबर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरना चिंता आहे ती खेळाडूंना पुढील मोठा हंगाम खेळण्याच्या दृष्टीने विश्रांती देण्याची. त्यामुळे खेळाडूंना अधून मधून विश्रांती देण्याचा संघ प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे उर्वरित पुणे आणि मुंबईच्या सामन्यांमध्ये भारतीय संघात तीन बदल दिसू शकतात. (Ind vs Eng, 4th ODI)
(हेही वाचा- Greatest Batsman of Generation : ‘या पिढीतील सर्वोत्तम कसोटीपटू कोण,’ रिकी पाँटिंगने दिलं थेट उत्तर)
त्यातच राजकोटच्या शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचे पडसादही संघ निवडीवर पडू शकतात. संघाचा पुण्यात सुरू असलेला सराव पाहिला तर संघात काही बदलांची चिन्हं आपल्याला दिसू शकतात. तिसऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली होती, पण, पुढील दोन सामने तो खेळेल अशीच शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने अर्शदीपच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली, पण अर्शदीप शमीची जागा घेण्याची शक्यता कमी आहे. फॉर्म हरवलेल्या रवी बिश्नोईच्या जागी अर्शदीप परतू शकतो. (Ind vs Eng, 4th ODI)
Rajkot ✈️ Pune#TeamIndia have arrived for the 4th #INDvENG T20I 😎@IDFCFIRSTBank pic.twitter.com/gnFfioFWQW
— BCCI (@BCCI) January 29, 2025
दुसरीकडे, हार्दिक पांड्याने तीन सामने खेळले आहेत. त्यामुळे संघ त्याला उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती देऊ शकतो. जेणेकरून तो एकदिवसीय मालिका आणि आगामी चॅम्पियन्स करंडकासाठी तंदुरुस्त राहील. हार्दिकच्या जागी शिवम दुबेचा अंतिम अकरामध्ये समावेश केला जाऊ शकतो. पाठीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळू न शकलेल्या रिंकू सिंगचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेलला संघाबाहेर राहावे लागेल. (Ind vs Eng, 4th ODI)
(हेही वाचा- अंतराळात अडकलेल्या Sunita Williams यांना मस्क परत आणणार; Donald Trump यांनी दिली जबाबदारी)
अशावेळी भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ पुढील प्रमाणे असू शकतो – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती. (Ind vs Eng, 4th ODI)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community