- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत भारतीय संघाने युवा अष्टपैलू खेळाडू आकाशदीपला संधी दिली आहे. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीचा फायदा त्याला मिळाला आहे. या मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे रजत पाटिदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि आता बंगालच्या आकाशदीपलाही संधी मिळाली आहे. (Ind vs Eng 4th Test)
गेले दोन दिवस रांचीतील सराव सत्र ज्या पद्धतीने पार पडली ते पाहता आकाशदीपच्या संघ निवडीचा कल्पना आलेली होती. कारण, तो सलग तासभर गोलंदाजीचा सराव करताना दिसला होता. पण, त्याचवेळी भारतीय संघ खेळपट्टीचं संथ स्वरुप पाहता संघात ४ फिरकीपटूंना खेळवतो का, एवढाच प्रश्न होता. पण, अखेर रोहित शर्माने आकाशदीपच्या नावाची घोषणा केली. (Ind vs Eng 4th Test)
🚨 A look at #TeamIndia‘s Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HxEpkWhcwh
— BCCI (@BCCI) February 23, 2024
(हेही वाचा – Manohar Joshi : राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला – नितीन गडकरी)
ही होती निवड समितीची पहिली पसंती
आकाशदीप ताशी १३२ किमीच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. आणि अलीकडेच इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध ३ कसोटींत भारतीय ए संघाकडून खेळताना त्याने १२ बळी टिपले होते. शिवाय तो अष्टपैलू आहे. आणि तळाला फलंदाजी करू शकतो. होआंगझाओला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या संघात तो होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३० सामन्यांत त्याने २३च्या सरासरीने १०४ बळी मिळवले आहेत. (Ind vs Eng 4th Test)
आयपीएलमध्ये आकाशदीप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा जसप्रीत आणि सिराजच्या बरोबरीने मुकेश कुमार निवड समितीची पहिली पसंती होता. पण, त्याला संधी मिळालेल्या विशाखापट्टणम कसोटी त्याचा काहीच प्रभाव पडला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याला रणजी खेळण्यासाठी संघातून मुक्त करण्यात आलं होतं. तिथे त्याने १० बळी मिळवले असले तरी एकंदरीत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळूनही त्याने साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी भारतीय संघाने आकाशदीपला पसंती दिली आहे. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community