Ind vs Eng 4th Test : इंग्लिश कर्णधार उर्वरित कसोटींत गोलंदाजी करण्याची शक्यता

मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेला इंग्लिश संघ विजयासाठी वेगवेगळी रणनीती आखण्याच्या प्रयत्नात आहे. 

205
Ind vs Eng 4th Test : इंग्लिश कर्णधार उर्वरित कसोटींत गोलंदाजी करण्याची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लिश संघावर ४३४ धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली. त्यानंतर मालिकेत पुनरागमन करण्यासाठी इंग्लिश संघ वेगवेगळ्या रणनीतीच्या विचारात आहे. याचा एक भाग म्हणून कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा गोलंदाजी करणार असल्याची शक्यता आहे. स्टोक्स (Ben Stokes) अष्टपैलू खेळाडू आहे. आणि तो मध्यमगती गोलंदाजीही करतो. पण, गुडघ्याच्या दुखापतीनंतर गोलंदाजीसाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. (Ind vs Eng 4th Test)

पण, या मालिकेत पुनरागमन करायचं असेल तर एक उपाय त्याला दिसतोय तो गोलंदाजी करण्याचा. ‘मी नेट्समध्ये १०० टक्के तंदुरुस्तीने गोलंदाजी करू शकलो,’ असं त्यानेच रांचीतील सरावानंतर बोलून दाखवलं. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Mahavikas Aghadi ने Vanchit आघाडीला जागावाटपापासून ठेवले ‘वंचित’)

इंग्लिश संघ बेन स्टोक्सच्या गोलंदाजीच्या क्षमतेचा घेणार फेरआढावा

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर अजून स्टोक्सने (Ben Stokes) सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. आणि या मालिकेत तो गोलंदाजी करणारही नव्हता. पण, आता मात्र तो त्यावर विचार करतोय. मालिकेत सलग २ सामन्यांत इंग्लिश संघाचा पराभव झाला. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत संघाची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. आणि पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरायचं असेल तर संघाला पहिल्या दोन जागांमध्ये स्थान पटकवावं लागेल. आणि त्यासाठी आता अवधीही कमी उरला आहे. (Ind vs Eng 4th Test)

‘सरावादरम्यान मी पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करू शकलो हे खरं आहे. आणि त्याने मला समाधानही मिळालं आहे. पण, मी कसोटीत गोलंदाजी करु शकेन की नाही, यासाठी मी वैद्यकीय पथकाशी चर्चा करूनच निर्णय घेईन,’ असं स्टोक्सने (Ben Stokes) पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बेन स्टोक्सने गोलंदाजी केली तर मार्क वूड किंवा जिमी अँडरसन यांच्यापैकी एकाला बसवून अतिरिक्त फलंदाज किंवा फिरकीपटू खेळवण्याचाही इंग्लंडचा विचार आहे. त्यामुळे २३ तारखेला कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लिश संघ बेन स्टोक्सच्या गोलंदाजीच्या क्षमतेचा फेरआढावा घेणार हे निश्चित आहे. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.