- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील चौथी कसोटी जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) खेळणार नाही यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. बीसीसीआयने पत्रक काढून संघातून बुमराला मुक्त केल्याचं जाहीर केलं आहे. (Ind vs Eng 4th Test)
‘या मालिकेचा प्रदीर्घ कालावधी आणि अलीकडे बुमराची क्रिकेटमधील व्यस्तता पाहून चौथ्या कसोटीसाठी त्याला संघातून मुक्त करण्यात आलं आहे. पाचव्या कसोटीत त्याचा समावेश त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल,’ असं बीसीसीआयने पत्रकातून स्पष्ट केलं आहे. (Ind vs Eng 4th Test)
भारतीय संघ मंगळवारी उशिरा रांचीला पोहोचला आहे. पण, संघाबरोबर बुमरा नव्हता. बुमराला विश्रांती तर के एल राहुलला तंदुरुस्तीच्या कारणावरून रांची कसोटीत खेळता येणार नाही. आणि पाचव्या कसोटीतील त्याचा समावेशही तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. त्यामुळे रजत पाटिदारला आणखी एक संधी मिळू शकेल. (Ind vs Eng 4th Test)
🚨 NEWS 🚨
Jasprit Bumrah released from squad for 4th Test.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/0rjEtHJ3rH pic.twitter.com/C5PcZLHhkY
— BCCI (@BCCI) February 20, 2024
(हेही वाचा – Virat & Anushka Welcome Baby Boy : विराट आणि अनुष्काने केलं आपल्या दुसऱ्या अपत्याचं स्वागत)
हैद्राबाद, विशाखापट्टणम आणि राजकोट असा तीन कसोटींत बुमराने आतापर्यंत ८१ षटकं टाकली आहेत. आणि यात आतापर्यंत सर्वाधिक १७ बळी टिपले आहेत. विशाखापट्टणम कसोटीत सिराजला विश्रांती देण्यात आली होती. तसाच निर्णय आता बुमराच्या बाबतीत घेण्यात आला आहे. (Ind vs Eng 4th Test)
बुमरा ऐवजी बदली खेळाडू दिला जाईल का हे निश्चित करण्यात आलेलं नाही. पण, मुकेश कुमारला तिसऱ्या कसोटीपूर्वी रणजी खेळण्यासाठी संघातून मुक्त करण्यात आलं होतं. तो आता रांचीपूर्वी संघाबरोबर परतेल. २०२४ मध्ये आयपीएल, टी-२० विश्वचषक अशा महत्त्वाच्या स्पर्धांबरोबरच खडतर असा ५ कसोटींचा ऑस्ट्रेलिया दौराही आहे. त्यामुळे खेळाडूंना अधून मधून विश्रांती मिळावी, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. (Ind vs Eng 4th Test)
रांची कसोटीसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, रजत पाटिदार, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल, कोना भरत, आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज व मुकेश कुमार. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community