- ऋजुता लुकतुके
दुखापतीचं आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतचं ग्रहण लागलेल्या भारतीय संघाला (Indian team) रांची कसोटीपूर्वी एक दिलासा मिळाला आहे. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज के एल राहुल दुखापतीतून सावरला असून तो रांचीमध्ये संघाबरोबर दाखल होण्याची शक्यता आहे. शेवटच्या ३ कसोटींसाठी संघ निवडताना राहुल ९० टक्के तंदुरुस्त होता. पण, आता तो पूर्णपणे सावरलाय असं समजतंय. (Ind vs Eng 4th Test)
‘राहुल रांचीला पोहोचतोय. आणि कसोटीसाठी तो उपलब्ध असेल,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं. हैद्राबाद कसोटीत राहुल हा भारताचा सर्वोत्तम धावसंख्या रचणारा फलंदाज होता. त्याचं शतक ४ धावांनी हुकलं होतं. पण, त्यानंतर कंबरेचा स्नायू दुखावल्यामुळे तो दुसरी आणि तिसरीही कसोटी खेळू शकला नव्हता. गेल्यावर्षी आयपीएलमध्येही त्याला याच दुखापतीने सतावलं होतं. पण, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत त्याने संघात पुनरागमन केलं, तेव्हापासून तो फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याने शतक झळकावलं होतं. (Ind vs Eng 4th Test)
KL Rahul set to return for 4th Test against England in Ranchi🇮🇳🏏 pic.twitter.com/A6nQMHzUfd
— CricketGully (@thecricketgully) February 19, 2024
(हेही वाचा – IT Companies in Pune : या आहेत पुण्यातील आघाडीच्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्या)
आता कमरेच्या दुखापतीतून तो सावरला असल्याचं समजतंय. त्याच्या अनुपस्थितीत रजत पाटिदारला भारतीय संघात संधी मिळाली. पण, पहिल्या कसोटीतील ३६ धावांचा अपवाद वगळता पाटिदारने राजकोटमध्ये तर दोन्ही डावांत भोपळा मिळवला आहे. याउलट सर्फराझ खानने पदार्पणातच दोन्ही डावांत अर्धशतक ठोकलं आहे. (Ind vs Eng 4th Test)
त्यामुळे राहुल परतला तर पाटिदारलाच तंबूत बसावं लागण्याची शक्यता आहे. पण, भारतीय संघाची मधली फळी मात्र राहुलच्या पुनरागमनामुळे सक्षम होईल. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community