Ind vs Eng 4th Test : रोहित शर्माच्या ४,००० कसोटी धावा पूर्ण 

रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कसोटी कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा रोहित शर्माने पूर्ण केला. 

215
Ind vs Eng 4th Test : रोहित शर्माच्या ४,००० कसोटी धावा पूर्ण 
  • ऋजुता लुकतुके

रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने (Indian team) इंग्लिश संघाने समोर ठेवलेल्या १९२ धावांचा पाठलाग सुरू केला. आणि त्या प्रयत्नांत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधील ४,००० धावांचा टप्पाही पार केला. कसोटीच्या पहिल्या डावात रोहित २ धावांवर बाद झाला होता. पण, यावेळी त्याने २० धावांचा टप्पा गाठला. आणि त्याचबरोबर ४,००० धावांचा टप्पाही ओलांडला. (Ind vs Eng 4th Test)

या कसोटी मालिकेत रोहित शर्मा चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या रचण्यात अपयशी ठरला आहे. आतापर्यंतच्या ७ डावांत त्याने ३८ च्या सरासरीने २६६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात केलेल्या १३१ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Ind vs Eng 4th Test)

तर आतापर्यंतच्या कारकीर्दीत रोहित (Rohit Sharma) ५८ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात ४४ च्या सरासरीने त्याने ४,००३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे ती २१२. आणि १०० डावांमध्ये त्याने ११ शतकं ६ अर्धशतकं केली आहेत. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : अर्धशतकानंतर ध्रुव जुरेलने सॅल्युट का केला?)

रोहित शर्माकडून भारतीय संघाला आशा

या कसोटीत विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळत नाहीए. तर चांगल्या फॉर्ममध्ये असलेला के एल राहुलही तीन कसोटी खेळू शकलेला नाही. अशावेळी अनुभवी रोहित शर्माकडून (Rohit Sharma) भारतीय संघाला आशा आहेत. सलामीला येऊन योग्य पायाभरणी करण्याची रोहितची जबाबदारी आहे. (Ind vs Eng 4th Test)

पण, नेमकी चांगली सुरुवात मिळूनही त्याचा फायदा तो उचलू शकलेला नाही. या मालिकेत त्याच्या धावा आहेत २४, ३९, १४, १३, १३१, १९ आणि २. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के एल राहुल, रवींद्र जडेजा, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल या युवा खेळाडूंनी मात्र दडपण झुगारून देत खेळ केला आहे. आणि भारतीय संघाच्या (Indian team) विजयातही मोठा वाटा उचलला आहे. (Ind vs Eng 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.