- ऋजुता लुकतुके
रांची कसोटी ५ गडी राखून जिंकत भारताने इंग्लंड विरुद्धची ही मालिकाही ३-१ ने जिंकली आहे. विशेष म्हणजे या मालिकेत भारतीय संघाचा अव्वल फलंदाज विराट कोहली खेळत नव्हता. तर के एल राहुल आणि रवींद्र जडेजाही नियमितपणे सर्व कसोटी खेळलेला नाही. अशावेळी भारतीय संघात मधल्या फळीत रजत पाटिदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि कोना भरत यांना संधी मिळाली. सर्फराझ आणि जुरेल यांनी ही संधी दोन्ही हातांनी घेतली. (Ind vs Eng 4th Test)
भारताने मायदेशातील १७ वी मालिका जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) युवा खेळाडूंना मिळालेल्या संधीवर एक सूचक आणि मोठं विधान केलं आहे. ‘इथून पुढे अशाच खेळाडूंना संधी मिळेल, जे विजयासाठी भुकेले आहेत,’ असं रोहितने सामना संपल्यानंतर बोलून दाखवलं. (Ind vs Eng 4th Test)
भारताच्या या मालिका विजयात यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल आणि आकाशदीप या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली. ‘जर खेळाडूंमध्ये चांगलं करुन दाखवण्याची आणि जिंकण्याची भूक नसेल तर अशा खेळाडूंना संधी देऊन काय उपयोग? कसोटी क्रिकेटमध्ये खूपच कमी संधी मिळतात. तिचं सोनं करून दाखवण्याची जिद्द तुमच्याकडे पाहिजे. भारतात असे कितीतरी खेळाडू आहेत,’ असं रोहित (rohit sharma) म्हणाला. (Ind vs Eng 4th Test)
A fantastic victory in Ranchi for #TeamIndia 😎
India clinch the series 3⃣-1⃣ with the final Test to be played in Dharamsala 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5I7rENrl5d
— BCCI (@BCCI) February 26, 2024
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करणाऱ्यांची एसआयटीद्वारे चौकशी करा; विधानसभा अध्यक्षांचे आदेश)
ही आशा रोहितने केली व्यक्त
आयपीएलसाठी काही खेळाडू कसोटीकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्नही रोहितला (rohit sharma) विचारण्यात आला. ‘आयपीएल आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच. पण, खरा कठीण फॉरमॅट कसोटी क्रिकेट हाच आहे. आणि इथं कसही लागतो. ज्यांना चांगलं करून दाखवण्याची भूक असेल तेच इथं चांगली कामगिरी करू शकतात,’ असं रोहित याविषयी बोलताना म्हणाला. (Ind vs Eng 4th Test)
या मालिकेत तयार झालेल्या युवा खेळाडूंचं रोहितने कौतुक केलं. ‘हे खेळाडू संघाला महत्त्व देतात. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक बदल करण्याची त्यांची तयारी आहे. आणि ते लवकर शिकतात. सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर करावे लागणारे शैलीतील बदल लगेच आत्मसात केले,’ असं रोहितने सांगितलं. (Ind vs Eng 4th Test)
ध्रुव, सर्फराझ, आकाशदीप सारखे खेळाडू पुढील ५-१० वर्षं भारतासाठी खेळू शकतील, अशी आशाही रोहितने (rohit sharma) व्यक्त केली आहे. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community