Ind vs Eng, 5th T20 : पाचव्या टी-२०त अभिषेक शर्मा – १३५; इंग्लंड सर्वबाद ९७

Ind vs Eng, 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा इंग्लंडवर १५० धावांनी मोठा विजय

66
Ind vs Eng, 5th T20 : पाचव्या टी-२०त अभिषेक शर्मा - १३५; इंग्लंड सर्वबाद ९७
Ind vs Eng, 5th T20 : पाचव्या टी-२०त अभिषेक शर्मा - १३५; इंग्लंड सर्वबाद ९७
  • ऋजुता लुकतुके 

भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाचव्या टी-२० सामन्याचं भवितव्य पहिल्या पॉवर प्लेमध्येच जवळ जवळ ठरून गेलं. आणि ते भारताच्या युवा अभिषेक शर्माने ठरवलं. कारण, भारताचा डाव सुरू झाल्या झाल्या त्याने षटकारांचीच भाषा बोलायला सुरुवात केली. आणि त्यामुळे ३ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये भारताचं अर्धशतक फलकावर लागलेलं होतं. आणि ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ९५ धावा झालेल्या होत्या. यात संजू सॅमसनने केल्या ७ चेंडूंत १६. बाकीच्या एकट्या अभिषेक शर्माने केल्या. सॅमसन बाद झाल्यावर त्याने तिलक वर्माशी ११५ धावांची भागिदारी केली. ती फुटली फक्त ९व्या षटकांत आणि यात तिलकच्या धावा होत्या फक्त १५ चेंडूंत २०. बाकीच्या अभिषेकने केल्या. या सामन्यात अभिषेकचा धडाकाच असा होता. त्याने एकूण ५४ चेंडूंत १३५ धावा केल्या. आणि यात १३ षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली. आतषबाजी हा शब्दही त्याच्या धडाक्याला फिका पडेल असाच आहे. (Ind vs Eng, 5th T20)

(हेही वाचा- School : राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध)

दुसऱ्या बाजूने शिवम दुबेनं १५ चेंडूंत ३० धावा करत त्याला थोडीफार साथ दिली. बाकी अभिषेकला मुंबईत कुणाच्या मदतीची गरज नव्हती. म्हणूनच धावफलक असं सांगतो की, एकट्या अभिषेकच्या धावा १३५ आणि इंग्लिश संघाच्या मिळून धावा झाल्या ९७. अभिषेकने गोलंदाजीतही चमक दाखवताना एका षटकात ३ धावा देत २ बळी मिळवले. त्यामुळे अभिषेकने इंग्लंड संघाला हरवलं, असं म्हणणं योग्य ठरेल. (Ind vs Eng, 5th T20)

 अभिषेकच्या धडाक्यामुळे भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे मैदानावरील टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या रचली. निर्धारित २० षटकांत भारताने ९ गडी गमावत २४७ धावा केल्या. भारतीय डावात एकूण १९ षटकार होते. याचं दडपण इंग्लिश संघावर नक्कीच आलं. कारण, सलामीवीर फील सॉल्ट सोडला तर एकाही फलंदाजाला मोकळेपणाने फलंदाजी करता आली नाही. फिल सॉल्टने मात्र पहिल्याच षटकात महम्मद शामीला फैलावर घेत पहिल्या ३ चेंडूंवर २ चौकार आणि एक षटकार अशा १४ धावा वसूल केल्या. पण, शामीनेच त्याला आपल्या दुसऱ्या षटकात बाद केलं. आणि तिथून इंग्लिश डावाला ओहोटी लागली ती कायमची. (Ind vs Eng, 5th T20)

(हेही वाचा- Union Budget 2025 : विमा कंपन्यांमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीचे चांगले परिणाम दिसतील!)

त्यानंतर जेकब बेथेलच्या १० धावा सोडल्या तर इतर एकही इंग्लिश फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. बेन डकेट (०), जोस बटलर (७), हॅरी ब्रूक (२) आणि लिअम लिव्हिंगस्टोन (९) झटपट बाद झाले. वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी २ तर मोहम्मद शमीने ३ बळी मिळवले. आणि अखेर ११ व्या षटकांतच इंग्लिश संघ ९७ धावांवर सर्वबाद झाला. भारताने या मालिकेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत ४-१ असा विजय मिळवला. सामनावीर अर्थातच अभिषेक शर्मा ठरला. तर मालिकावीर म्हणून वरुण चक्रवर्तीची निवड झाली. (Ind vs Eng, 5th T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.