Ind vs Eng 5th Test : राहुल द्रविड बरोबरच्या १५ मिनिटांच्या चर्चेनं पड्डिकलवर केली जादू 

Ind vs Eng 5th Test : देवदत्त पड्डिकलने कसोटी पदार्पणात ६८ धावा केल्या 

156
Ind vs Eng 5th Test : राहुल द्रविड बरोबरच्या १५ मिनिटांच्या चर्चेनं पड्डिकलवर केली जादू 
Ind vs Eng 5th Test : राहुल द्रविड बरोबरच्या १५ मिनिटांच्या चर्चेनं पड्डिकलवर केली जादू 
  • ऋजुता लुकतुके

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज रजत पाटिदारला झालेल्या दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी त्याची धरमशाला कसोटीसाठी भारतीय संघात वर्णी लागली. पण, पहिल्याच डावात शांत आणि धीरोदात्त ६८ धावा करून देवदत्त पड्डिकलने (devdutt padikkal) सगळ्यांची मनं जिंकली आहेत. चांगली लय सापडलेली असताना शोएब बशिरच्या एका अप्रतिम चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. पण, तोपर्यंत भारतीय संघाला त्याने कसोटीत वर्चस्व मिळवून दिलं होतं. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : अमित शहा यांच्या निवासस्थानी खलबतं; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांविषयी काय ठरलं ?)

१०३ चेंडूंच्या या खेळीत देवदत्तने १० चौकार आणि १ देखणा षटकार ठोकला. त्याचे कव्हर ड्राईव्ह आणि आत्मविश्वासपूर्ण लेटकपचे फटके लक्षवेधी ठरले. आणि महत्त्वाचं म्हणजे गोंधळून न जाता जबाबदारीने फलंदाजी करण्याची त्याची तयारीही दिसली. रोहीत आणि शुभमन झटपट बाद झाल्यानंतर सर्फराझबरोबर ९७ धावांची भागिदारी रचून त्याने भारतीय संघाला कसोटीत वर्चस्व मिळवून दिलं. (Ind vs Eng 5th Test)

दिवस संपल्यानंतर या खेळीचं श्रेय देवदत्तने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना दिलं. ‘पहिली १०-१५ मिनिटं तुझ्या छातीत धडधड होत राहील. पण, त्या भांबावलेल्या क्षणांचीही मजा लूट. आणि मग बिनधास्त खेळ. सगळं ठिक होईल, असं राहुल सर फलंदाजीला जाण्यापूर्वी म्हणाले होते. तसंच झालं,’ असं देवदत्त म्हणाला. (Ind vs Eng 5th Test)

भारतीय संघात मिळालेली संधी आणि फलंदाजीचा दृष्टिकोण याचं श्रेय मात्र त्याने फलंदाजी आणि एकूणच जीवनातील शिस्तीला दिलं. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- Ind vs Eng 5th Test : रोहित शर्माची द्रविड आणि गावसकर यांच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी)

‘मला आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे तंत्रात मी सुरुवातीपासून फारसे बदल केलेले नाहीत. पण, मनावर खूप संस्कार केले आहेत. मागची २-३ वर्षं मी म्हणावं तसं क्रिकेट खेळू शकलो नाही. तेव्हाच मला लक्षात आलं की, मी खेळापासून दूर राहू शकत नाही. मग खेळासाठी काहीही करण्याची उर्मी मनात निर्माण झाली. आणि त्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो,’ असं देवदत्तने बोलून दाखवलं. (Ind vs Eng 5th Test)

२०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर देवदत्तला कोव्हिड झाला. आणि त्यानंतर पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे मागची ३ वर्षं तो नियमितपणे खेळूही शकलेला नाही. पण, या दुखापतींनीच त्याच्या जीवनात आणि खेळात शिस्त आली, असं देवदत्त मानतो. (Ind vs Eng 5th Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.