- ऋजुता लुकतुके
शेवटच्या ३ कसोटींसाठीचा संघ जाहीर करताना निवड समितीने तंदुरुस्त असल्यास या तत्त्वावर के एल राहुलची निवड संघात केली होती. पण, तिसरी आणि चौथी कसोटी तो खेळू शकला नाहीच. आणि आता शेवटच्या धरमशाला कसोटीतही तो नसेल हे स्पष्ट झालं आहे. कमरेच्या स्नायूची दुखापत अजून बरी झालेली नाही. आणि तो डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला गेला आहे. (Ind vs Eng 5th Test)
त्याचवेळी चौथ्या कसोटीत विश्रांती घेतलेला जसप्रीत बुमरा मात्र संघात परतणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. सध्या संधाबरोबर असलेला वॉशिंग्टन सुंदरही तामिळनाडू या आपल्या स्थानिक संघात दाखल होईल. रणजीची उपांत्य फेरीची लढत तो खेळणार आहे. २ मार्चला मुंबई विरुद्ध तामिळनाडू अशी रणजी करंडकाची उपांत्य फेरीची लढत मुंबईत सुरू होणार आहे. (Ind vs Eng 5th Test)
🚨 NEWS 🚨#TeamIndia‘s squad for the 5th @IDFCFIRSTBank Test against England in Dharamsala announced.
Details 🔽 #INDvENG https://t.co/SO0RXjS2dK
— BCCI (@BCCI) February 29, 2024
(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : धरमशाला कसोटीत रोहितला संधी गौतम गंभीरला मागे टाकण्याची)
उपांत्य लढत संपली की मग सुंदर पुन्हा एकदा भारतीय संघात परतेल. भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शामीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया पार पडल्याचंही बीसीसीआयने अधिकृतपणे कळवलं आहे. काही दिवसांतच तो लंडनहून परतेल आणि बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यानंतरच्या उपचारांसाठी दाखल होईल. (Ind vs Eng 5th Test)
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटिदार, सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कोणा भरत, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाशदीप, मोहम्मद सिराज, आवेश खान व मुकेश कुमार. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community