- ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण, मालिकेचा निकाल लागलेला असला तरी ही कसोटी काही वैयक्तिक मापदंडांची असणार आहे. एकतर आर अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांची ही शंभरावी कसोटी असणार आहे. आणि अश्विनला या मापदंडाबरोबरच आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. (Ind vs Eng 5th Test)
अश्विनने एका डावात ५ बळी घेतले तर डावांत सर्वाधिक वेळा ५ बळी घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम तो मोडू शकतो. राजकोट कसोटीत अश्विनने ५०० कसोटी बळींचा टप्पा पार केला होता. त्यानंतर तो आपली १०० वी कसोटी खेळतोय. आणि त्यातच आणखी एक विक्रम त्याला खुणावतोय. (Ind vs Eng 5th Test)
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे प्रवेश प्रक्रियेत किती जागांवर होणार परिणाम? जाणून घ्या…)
अश्विनने आतापर्यंत ३५ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची किमया केली आहे. आणि या बाबतीत तो अनिल कुंबळेच्या बरोबर भारताकडून अव्वल स्थानावर आहे. धरमशालामध्ये त्याने डावात ५ बळी मिळवले तर तो अनिल कुंबळेला मागे टाकू शकेल. फक्त इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही येणाऱ्या काही कसोटींमध्ये तो रिचर्ड हॅडली आणि शेन वॉर्नला मागे टाकू शकेल. (Ind vs Eng 5th Test)
Ravichandran Ashwin in Test cricket:
Matches – 99
Wickets – 507
Five wicket haul – 35
Runs – 3309
Hundreds – 5Ashwin will be playing his 100th Test on Thursday, an iconic Test career. 🐐 pic.twitter.com/SxaUanUDAX
— Johns. (@CricCrazyJohns) March 5, 2024
आंतरराष्ट्रीय स्तरावर डावात सर्वाधिक वेळा ५ बळी घेणाऱ्यांमध्ये फिरकी गोलंदाजांचीच संख्या जास्त आहे. सगळ्यात वर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने अढळ स्थान पटकावलंय. त्याने १३३ कसोटींत त्याने तब्बल ६७ वेळा ही कामगिरी केलीय. तर खालोखाल शेन वॉर्नने १४५ कसोटींत ३७ वेळा डावांत ५ बळी टिपले आहेत. सर रिचर्ड हॅडली हे एकमेव तेज गोलंदाज पहिल्या दहांत आहेत. आणि त्यांनी अशी कामगिरी ८६ कसोटींत ३६ वेळा केली आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांचाच. त्यामुळे अश्विनला येत्या काळात भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज होण्याबरोबरच डावांत ५ बळी घेण्याच्या निकषावरही सर हॅडली आणि शेन वॉर्नला मागे टाकण्याची संधी आहे. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community