- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या धरमशाला कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व गाजवलं. आणि या कसोटीसह ही मालिका ४-१ ने जिंकून भारताने इंग्लंडला चारी मुंड्या चीत केलं आहे. पण, तरीही धरमशाला कसोटी एका इंग्लिश खेळाडूसाठी यादगार ठरली आहे. जिमी अंडरसन हा त्यांचा ३७ वर्षीय तेज गोलंदाज ही कसोटी आणि तिचा तिसरा दिवस नक्की लक्षात ठेवेल. (Ind vs Eng 5th Test)
पहिल्या सत्रात अँडरसनने कुलदीप यादवला ३० धावांवर बाद केलं. आणि त्यानंतर त्याने हवेत हात उंचावले. कारण, हा त्याचा कसोटी क्रिकेटमधला ७०० वा बळी होता. आणि विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो फक्त तिसरा आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे. आणि पहिलाच तेज गोलंदाज. (Ind vs Eng 5th Test)
मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्या नंतर आता अँडरसनचाच क्रमांक लागतो. (Ind vs Eng 5th Test)
Bow down to the Swing King! 👑
James Anderson has become the first pacer to claim 7️⃣0️⃣0️⃣ wickets in Test Cricket. 🙌#IDFCFirstBankTestSeries #BazBowled #INDvENG #JioCinemaSport pic.twitter.com/Rj6iHht5J4
— JioCinema (@JioCinema) March 9, 2024
या बळीनंतर अँडरसनने चेंडू हवेत धरला. आणि प्रेक्षकांनीही त्याला उभं राहून मानवंदना दिली. ही मालिका सुरू झाली तेव्हा अँडरसनला ७०० आकडा गाठण्यासाठी १० बळी हवी होते. पहिली कसोटी तो खेळला नाही. पण, त्यानंतर राजकोट आणि रांचीमध्ये त्याने आपली स्विंगची ताकद दाखवून दिली आहे. (Ind vs Eng 5th Test)
२००३ मध्ये झिंबाब्वे विरुद्ध लॉर्ड्सवर अँडरसनने कसोटीत पदार्पण केलं होतं. आणि तेव्हापासून आतापर्यंत तो इंग्लंडसाठी १८७ कसोटी सामने खेळला आहे. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे तो स्विंगचा बादशाह म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. २७ च्या सरासरीने ७०० बळी घेताना त्याने ३२ वेळा डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी केली आहे. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community