- ऋजुता लुकतुके
धरमशाला कसोटीचा पहिला दिवस रवीचंद्रन अश्विनसाठी (ravichandran ashwin) महत्त्वाचा होता. शंभरावी कसोटी खेळत त्याने आपलं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोरलं आहे. अशी कामगिरी करणारा तो चौदावा भारतीय ठरला आहे. त्यानिमित्ताने कसोटी सुरू होण्यापूर्वी अश्विनचा सत्कार करण्यात आला. त्याची पत्नी आणि दोन मुलीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. (Ind vs Eng 5th Test)
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते अश्विनचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हे सन्मानचिन्ह म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाची कसोटी साठीची निळी टोपी हे होतं. भारतीय क्रिकेटसाठी आतापर्यंत अश्विनने दिलेल्या योगदानासाठी त्याचा गौरव करण्यात आला. (Ind vs Eng 5th Test)
💯 reasons to celebrate the moment!#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents a special memento to @ashwinravi99 on the occasion of his 100th Test match 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/OwZ4YNua1o#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vxvw5jQ1z1
— BCCI (@BCCI) March 7, 2024
ही कसोटी मालिका अश्विनसाठी यादगार अशीच ठरली आहे. राजकोट कसोटीत त्याने ५०० कसोटी बळींचा टप्पा सर केला. अशी कामगिरी करणारा अनिल कुंबळे नंतरचा तो दुसरा फिरकीपटू आहे. तर भारतीय खेळपट्टीवर सर्वाधिक ३५४ बळी मिळवण्याची कामगिरीही त्याने केली आहे. या बाबतीत अनिल कुंबळे (३५० बळी) त्याने धरमशालात मागे टाकलं आहे. (Ind vs Eng 5th Test)
सत्काराला उत्तर देताना अश्विनने आतापर्यंतच्या प्रवासाचं श्रेय वडील रवीचंद्रन यांना दिलं. तसंच पत्नी प्रीती आणि मुलींनी दिलेल्या साथीसाठी त्याने तिघींचे आभार मानले. (Ind vs Eng 5th Test)
𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗔𝗻𝗱 𝗠𝗲𝗺𝗼𝗿𝗶𝗲𝘀 – 𝗳𝘁. 𝗣𝗿𝗶𝘁𝗵𝗶 𝗔𝘀𝗵𝘄𝗶𝗻! ☺️#TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @prithinarayanan | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kIhho9q4uY
— BCCI (@BCCI) March 7, 2024
(हेही वाचा – Price Reduced: गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी कपात, पंतप्रधान मोदींची घोषणा)
‘माझ्या पत्नीला माझ्याशी लग्न करताना क्रिकेटपटूशी लग्नं करणं म्हणजे काय याची कल्पना नव्हती. पण, तिने मला यश आणि अपयशातही साथ दिली. गेली काही वर्षं माझा प्रवास माझ्या मुलींनीही पाहिला आहे. आणि या तिघी मी शंभरावी कसोटी खेळताना माझ्याबरोबर आहेत. त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचलो आहे. माझ्या कारकीर्दीचे आणखी एक शिल्पकार या क्षणी चेन्नईत आहेत,’ असं अश्विन (ravichandran ashwin) यावेळी बोलताना म्हणाला. (Ind vs Eng 5th Test)
अश्विनने शंभराव्या कसोटीच्या निमित्ताने कसोटी क्रिकेटचं महत्त्वही अधोरेखित केलं. कसोटी म्हणजे समर्पण, प्रतिकार आणि खेळाला पुढे नेण्याचा, जिंकण्याचा निर्धार असं वर्णन अश्विनने केलं. (Ind vs Eng 5th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community