- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालंय. मालिका भारताने ३-१ ने खिशात टाकली आहे. या मालिकेवर अपेक्षित होतं तसंच वर्चस्व गाजवलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली, के एल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे भारतासाठी जमेच्या गोष्टी खूप आहेत. तर इंग्लंडची बॅझ-बॉल रणनीती भारतात तरी चालली नाही, असं चित्र आहे. (Ind vs Eng 5th Test Preview)
तरीही धरमशाला कसोटी खासच असणार आहे. रवीचंद्रन अश्विन आणि इंग्लंडकडून जिमी बेअरस्टो आपली शंभरावी कसोटी खेळत आहेत. अश्विनला भारताचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज म्हणून अनिल कुंबळेच्या पुढे जाण्याची संधी आहे. आणि संघाचं म्हणाल तर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान टिकवायचंय. आणि इंग्लंडला तळाचं आपलं स्थान सुधारायचंय. त्यामुळे इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने कसोटी आधी स्पष्ट केलंय की, ते जिंकण्यासाठी खेळणार. आणि कसोटी क्रमवारीसाठी खेळणार. नेहमीप्रमाणे त्यांचा अंतिम अकराचा संघ त्यांनी जाहीर केला आहे. (Ind vs Eng 5th Test Preview)
We make one change for the final match of the series 🔁
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) March 6, 2024
(हेही वाचा – MahaShivaratri Wishes : महाशिवरात्रीच्या निमित्ताने आप्तस्वकियांना द्या ‘या’ शुभेच्छा… जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व)
इंग्लिश संघाने जाहीर केला अकरा जणांचा संघ
यात ऑली रॉबिनसनच्या जागी मार्क वूडला संघात पुन्हा जागा मिळाली आहे. या मालिकेत कायम इंग्लिश संघाने आपला अंतिम अकरा जणांचा संघ एक दिवस आधीच जाहीर केला आहे. यावेळीही त्यांनी दोन तेज गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज असा संघ जाहीर केला आहे. धरमशालाची खेळपट्टी तेज गोलंदाजीला साथ देत असताना त्यांनी बशिर आणि हार्टली हे दोन फिरकी गोलंदाज कायम ठेवले आहेत. (Ind vs Eng 5th Test Preview)
भारताने मात्र अजून ते नेमकं काय करणार हे जाहीर केलेलं नाही. मागचे दोन दिवस संघाने धरमशालात जोरदार सराव मात्र केला आहे. (Ind vs Eng 5th Test Preview)
📍 Dharamsala ⛰️
Getting series finale READY 👍 👍#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bjtFD6y3EK
— BCCI (@BCCI) March 5, 2024
पाटिदारलाच संधी मिळेल अशी चिन्हे
मालिका खिशात टाकल्यावर आणि युवा खेळाडूंनी मालिका गाजवलेली असताना संघासमोर समस्या अशा फारशा नाहीएत. पण, मधल्या फळीत रजत पाटिदारला आणखी एक संधी द्यायची की देवदत्त पाल्लिकलला पदार्पणाची संधी द्यायची हा संघासमोरचा एक प्रश्न असेल. दोघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केलाय. त्यामुळे संघ प्रशासनाचा कल नेमका कुणाकडे आहे, हे आताच सांगता येणार नाही. पण, पाटिदारलाच संधी मिळेल अशी चिन्ह आहेत. (Ind vs Eng 5th Test Preview)
गोलंदाजीत भारतीय संघ ३ तेज गोलंदाज खेळवतो की, ३ फिरकी गोलंदाज हा मात्र अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, धरमशाला खेळपट्टी निदान दिवसाच्या सुरुवातीला स्विंग होऊ शकते. वाराही खूप असल्यामुळे चेंडू हवेत स्विंग होतो. अशावेळी आकाशदीप इथं उपयोगी पडू शकतो. त्यामुळे धरमशाला कसोटी मालिकेचा निर्णय आधीच झाल्यामुळे निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची नसली तरी खेळाडूंसाठी वैयक्तिक मापदंड आणि कामगिरीसाठीही महत्त्वाचीच आहे. (Ind vs Eng 5th Test Preview)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community