Ind vs Eng 5th Test : रोहित शर्माची द्रविड आणि गावसकर यांच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी

Ind vs Eng 5th Test : रोहितने शुक्रवारी या मालिकेतील आपलं दुसरं शतक झळकावलं

176
Ind vs Eng 5th Test : रोहित शर्माची द्रविड आणि गावसकर यांच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी
Ind vs Eng 5th Test : रोहित शर्माची द्रविड आणि गावसकर यांच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी
  • ऋजुता लुकतुके

धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. त्याचे कट आणि पूलचे फटके नेहमीसारखे बसत होते. आपलं बारावं कसोटी शतक झळकावताना रोहीतने इंग्लिश गोलंदाजांना पुरतं नेस्तनाबूत केलं. तो, यशस्वी आणि पुढे शुभमनने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आधीच मालिकेत ३-१ ने आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाला धरमशालातही विजयाची आशा निर्माण झाली आहे. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : अमित शहा यांच्या निवासस्थानी खलबतं; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांविषयी काय ठरलं ?)

टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर डीप मिड-विकेटकडे चेंडू टोलवून रोहीतने एक धाव वसूल केली आणि आपलं शतक पूर्ण केलं. (Ind vs Eng 5th Test)

या शतकाबरोबरच रोहितने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) ४८ आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने आतापर्यंत कसोटीत १२, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१ आणि टी-२० क्रिकेटमध्ये ५ शतकं झळकावली आहेत. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नावावरही ४८ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. द्रविडने ३६ कसोटी आणि १२ एकदिवसीय शतकं ठोकली होती. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा- PM Modi Kaziranga : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगलसफारी)

रोहितने (Captain Rohit Sharma) घरमशालातील खेळीने सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्याशीही बरोबरी साधली आहे. इंग्लिश संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकवण्याच्या बाबतीत तो आता सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्याबरोबर यादीत अव्वल आहे. सुनील गावसकर (sunil gavaskar) इंग्लंड विरुद्ध ३८ कसोटी सामने खेळले. आणि यात त्यांनी ४ शतकं झळकावली होती. धर्मशालामध्ये केलेलं शतक रोहितचं इंग्लिश संघाविरुद्धचं चौथं शतक होतं. (Ind vs Eng 5th Test)

धर्मशालामध्ये रोहितने (Captain Rohit Sharma) १६२ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार आणि १३ चौकार ठोकले. बेन स्टोक्सच्या एका अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. (Ind vs Eng 5th Test)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.