ऋजुता लुकतुके
या स्पर्धेत चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाला आता उरले सुरले कच्चे दुवेही संपवायचे आहेत. संघाचा उपान्त्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे. त्यामुळे संघ आता खेळाडूंच्या छोट्या छोट्या त्रुटींवर काम करताना दिसतोय. लखनौ इथं एकाना स्टेडिअमवर भारतीय संघासाठी दुपारच्या उन्हात वैकल्पिक सराव सत्र आयोजित करण्यात आलं होतं. (Ind vs Eng)
शुभमन गिल आणि ईशान किशन सह तळाच्या पाच फलंदाजांनी यात भाग घेतला. शुभमन गिल आखूड टप्प्याच्या चेंडूंवर जोरदार सराव करताना दिसला. या स्पर्धेत सुरुवातीचे तीन सामने डेंग्यूमुळे तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर चुकीचे फटके खेळून तो लवकर बाद झाला आहे. पुढच्या तीन सामन्यात त्याच्या धावा आहेत २६,५३ आणि १६. म्हणजेच चांगल्या सुरुवातीनंतर तो चुकीचा फटका खेळून बाद होतोय. (Ind vs Eng)
(हेही वाचा – Lalit Patil : ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे रोझरी एज्युकेशन ग्रुपपर्यंत; तपास चालू)
त्यामुळे लखनौमध्ये त्याने थ्रो-डाऊन सत्रात तेज गोलंदाजीचाच सामना केला. तशा गिलने २०२३ च्या वर्षात आतापर्यंत १,३२५ एकदिवसीय धावा केल्या आहेत. पण, विश्वचषकात तो थोडाफार अडखळतोय. म्हणूनच या वैकल्पिक शिबिरात सहभागी होणारा तो एकमेव फलंदाज होता. (Ind vs Eng)
The King and the Prince in practice session. pic.twitter.com/RqJF91DqHj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
शुभमन शिवाय ईशान किशननेही फलंदाजीचा २ तास सराव केला. तर शार्दूल ठाकूर, महम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांनीही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. तळाची फलंदाजी मजबूत करणं हाच या नेट्सचा उद्देश होता. हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर जबाबदारी वाढणार आहे. (Ind vs Eng)
विराट कोहली, रोहीत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी शुक्रवारच्या या नेट्सला न जाता हॉटेलवर विश्रांती घेणंच पसंत केलं. गुरुवारी या सगळ्यांनी जोरदार सराव केला होता. गुरुवारच्या नेट्समध्ये खेळाडूंनी काही गमतीचे क्षणही अनुभवले. यात जाडेजाने उजव्या हाताने तर जसप्रीत बुमराने डाव्या हाताने गोलंदाजी केली. शुभमन गिलनेही गोलंदाजीचा सराव केला होता. (Ind vs Eng)
Bumrah bowling left-handed.
Jadeja bowling right-handed.
Kuldeep bowling right-handed.
Kohli bowling to Rohit.
Gill bowling. pic.twitter.com/wrHqty4wlM— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 27, 2023
तर विराट कोहलीने कर्णधार रोहीत शर्माला गोलंदाजी केली होती. शुक्रवारच्या वैकल्पिक सत्रात खासकरून फलंदाजीचा सराव झाला. आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फलंदाजीवर मेहनतही घेतली. द्रविड यांचं एकाना स्टेडिअमच्या लाल मातीच्या खेळपट्टीवरही विशेष लक्ष होतं.
ही खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आणि धावांचं नंदनवन असलेली असेल असा अंदाज आहे. (Ind vs Eng)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community