Ind vs Eng : इंग्लंड विरुद्ध के एल राहुल ठरला भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक

‘बेस्ट फिल्डर ऑफ द टीम’ या पुरस्कारामुळे संघाचं क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचं होतंय.

98
Ind vs Eng : इंग्लंड विरुद्ध के एल राहुल ठरला भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक

ऋजुता लुकतुके

या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील (Ind vs Eng) सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पुरस्कार देण्यात येतो हे एव्हाना सगळ्यांना माहीत आहे. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलीप यांनी शोधून काढलेली ही पद्धत खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहे. आणि खेळाडूंमध्ये त्यासाठी स्पर्धाही आहे.

आता टी दिलीप (Ind vs Eng) फक्त पुरस्कार जाहीर करून थांबले नाही, तर तो देण्याच्या अभिनव कल्पना प्रत्येक सामन्यागणिक त्यांनी शोधून काढल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षक के एल राहुलला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान मिळाला. या पुरस्कारासाठी त्याचं नाव घोषित झालं तो क्षण अगदी राहुलसाठीही अनपेक्षित होता. त्यासाठी खालील व्हीडिओ शेवटपर्यंत पाहा.

टी दिलीप यांनी सुरुवातीच्या भाषणानंतर सगळ्यांना ड्रेसिंग (Ind vs Eng) रुमच्या बाहेर नेलं. आणि तिथे स्टेडिअमवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लावलेले लेझर लाईट्स त्यांनी हा पुरस्कार जाहीर करण्यासाठी वापरले. क्षणभर अख्ख्या मैदानात अंधार पसरला. आणि मग समोरच्या गॅलरीत दिवे लागले. आणि यात के एल राहुलची पाठमोरी जर्सी आणि त्यावर राहुल हे शब्द लेझरने लिहिलेले होते.

(हेही वाचा – Preeti Dighe : मुंबई महापालिकेच्या शिरपेचात ताज)

अर्थातच, के एल राहुलला रविवाराच फिल्डर ऑफ द मॅच (Ind vs Eng) हा पुरस्कार मिळाला होता. दिलीप यांनी यापूर्वीही हा पुरस्कार देण्यासाठी अशा अभिनव योजना राबवलेल्या आहेत. आधीच्याच सामन्यात खुल्या मैदानात ड्रोनने एक फ्रेम श्रेयस अय्यरच्या हातात अलगदपणे आली. त्यात त्याचाच फोटो होता.

अर्थात, त्या दिवशी पुरस्कार (Ind vs Eng) श्रेयस अय्यरने जिंकलेला होता. हा पुरस्कार आणि तो जाहीर करण्याची पद्धत भारतीय खेळाडूंमध्ये चांगलीच लोकप्रिय होतेय. राहुलच्या नावाची घोषणा करताना दिलीप यांनी विराट कोहली, रोहीत शर्मा आणि रवी जाडेजा यांच्या क्षेत्ररक्षणाचंही कौतुक केलं. खासकरून गवतावर दव असताना, तिघांनीही चेंडू ओला राहणार नाही, याची घेतलेली काळजी त्यांनी आवर्जून बोलून दाखवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.